Posted in

Shetkari Karjamafi Yojana  : कर्जमाफीचे 7,000 कोटी रुपये उद्या मंगळवारी होणार वितरीत?

Shetkari karjamafi yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Shetkari Karjamafi Yojana : राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ साठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात २० हजार ५५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी सध्या उपलब्ध निधीतून ७ हजार कोटी रुपये वितरित करण्यास 30 जुलै च्या शासन निर्णय द्वारे मंजुरी देण्यात आली होती.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी राज्य सरकारने ७ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी दिनांक 04 ऑगस्ट रोजी सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Shetkari Karjamafi Yojana )

 

पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे. तसेच जसजशी ई-केवायसी पूर्ण होईल, तसतशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार आहे. (Shetkari Karjamafi Yojana )

 

पात्र कर्जखात्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचे वितरण सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, आता कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यातील ७000 कोटी रुपयांच्या वितरणामुळे लाखो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असून, त्यानंतर त्यांना नव्याने पीककर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

 

 

error: Content is protected !!
Created with ❤