State Mechanization Fund : PM RKVY अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उप अभियानासाठी सन २०२६-२७ मध्ये तिन्ही प्रवर्गासाठी (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती.) दुसऱ्या हप्त्याचा एकूण रु.२१८.०५ कोटी इतका निधी वितरित करण्यबाबत चा शासन निर्णय हा आज दिनांक 03 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर, कृषि यांत्रिकीकरण घटका तिल विविध कृषि यंत्र औजारे यांचे अनुदान शेतकऱ्यांना वितरण करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. (State Mechanization Fund )
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषि विकास योजना (PM-RKVY) अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) साठी सन २०२६-२७ करिता दुसऱ्या हप्त्याचा केंद्र हिस्सा रु.१३०.८३ कोटी वितरित केला असल्याचे कळविले आहे. त्यानुसार दुसऱ्या हप्त्याचा केंद्र हिस्सा रु.१३०.८३ कोटी व त्यास अनुरूप राज्य हिस्सा रु.८७.२२ कोटी असा एकूण रु.२१८.०५ कोटी इतका निधी आयुक्त (कृषि) यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुषंगाने 03 ऑगस्ट 2026 शासन निर्णय घेण्यात आला आहे.
सन २०२६-२७ मध्ये PM-RKVY अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानासाठी तिन्ही प्रवर्गासाठी प्राप्त झालेला केंद्र हिस्सा रु.१३०.८३ कोटी (रुपये एकशे तीस कोटी ज्योअंश लाख फक्त) त्यास अनुरूप राज्य हिस्सा रु.८७.२२ कोटी (रुपये सत्ताऐंशी कोटी बावीस लाख फक्त) असा एकूण रु.२१८.०५ कोटी (रुपये दोनशे अठरा कोटी पाच लाख फक्त) इतका निधी आयुक्त (कृषि) यांना निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे.
या उप-अभियानाकरिता वितरीत केलेला निधी केंद्र शासनाने वार्षिक कृति आराखड्यात मंजूर केलेल्या बाबींवर खर्ची ठाकावा तसेच, अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महा-डीबीटी प्रणालीद्वारे आधारसंलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी.
ट्रॅक्टर या घटकासाठी अनुदान मर्यादा अल्प-अत्यल्प भूधारक/महिला/SC/ST साठी रक्कम रु.१.२५ लाख व इतर प्रवर्गासाठी रु.१.०० लाख सिमित करण्यार आलेली आहे. इतर यंत्र/अवजाराच्या बाबतीत केंद्र शासनाच्या कृषि यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचना, अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यार यावे असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे.








