Shetkari Karjamafi : राज्यातील १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची पहिली यादी प्रसिद्ध केली करण्यात आलेली होती. आतापर्यंत ११ लाख ४६ हजार पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आज रोजी आम्हाला कर्जमुक्तीचे पैसे जमा करायचे होते. पण आजही काही तांत्रिक अडचण आली. तरीही आज किंवा उद्या बँकेत पैसे जमा होतील, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत आज दिली आहे. (Shetkari Karjamafi )
ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखांवर कर्ज आहे, त्यांना 2 लाखांवरील रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत वेळ दिला आहे. शेतकऱ्यांनी आता ५ हजार, १० हजार रुपये अशी रक्कम भरण्यास सुरुवात केलेली आहे. जशी त्यांची दोन लाखांवरील रक्कम जमा होईल तसे बँकेकडून त्या शेतकऱ्यांचे नंबर येतील. त्या याद्या आम्ही प्रसिद्ध करुयासाठी जरा वेळ लागेल. (Shetkari Karjamafi )
परंतु, बहुतांश म्हणजे २ लाखांच्या आत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होईल. पण दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वेळ लागू शकतो, असे सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले. (Shetkari Karjamafi )
कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. यात अल्पमुदतीच्या पीक कर्जाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्गही मोकळा करण्यात आला आहे. पण कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्षात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात विलंब झाला आहे. परंतु, आज किंवा उद्या बँकेत पैसे जमा होतील, अशी माहिती मिळाली आहे. (Shetkari Karjamafi )








