Posted in

Agrim Anudan : रु. 5000 अनुदान अग्रिम “या” तारखेपर्यंत मिळणार | फार्मर आयडी आवश्यक असणार?

Anudan agrim farmer id
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
1/5 - (2 votes)

Agrim Anudan : सध्या राज्यामध्ये अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत शासना द्वारे देण्यात येणार आहे. ही मदत 5 नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. Agrim Anudan

 

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केंद्रीय पथकाच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना मदत, पाणीटंचाईवरील उपाययोजना आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत अग्रीम मदत वेळेत पोहोचावी, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. Agrim Anudan

 

अनुदान वाटप साठी अ‍ॅग्रीस्टॅकचा आधार

 

दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमधील सव्वाकोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम जमा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील आढावाही बैठकीत मुख्य सचिवांनी घेतला. पंचनाम्यांची वाट न पाहता अ‍ॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी झालेले (शेतकरी आयडी मिळालेले) जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात लगेच पैसे टाकता येतील, असा पर्यायही समोर आला आहे. त्यामुळे, अ‍ॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असेलेल्या शेतकऱ्यांना 5 नोव्हेंबेर पर्यन्त ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे. Agrim Anudan

 

 

राहिलेल्या शेतकऱ्यांनी अ‍ॅग्रीस्टॅक फार्मर आयडी तात्काळ काढून घ्यावा 

 

अ‍ॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी झालेले (शेतकरी आयडी मिळालेले) जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात लगेच पैसे टाकता येतील, असा पर्यायही समोर आला आहे. त्यामुळे, अ‍ॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असेलेल्या शेतकऱ्यांना 5 नोव्हेंबेर पर्यन्त ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे तर, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले नाहीत त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावेत.  Agrim Anudan

 

 

error: Content is protected !!