Jaltara Scheme : जलतारा हा पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्याचा जलसंधारण उपक्रम आहे. महाराष्ट्रात हा उपक्रम शेतातील पाणी वाहून जाणे कमी करण्यासाठी, विहिरींची पाणीपातळी सुधारण्यासाठी आणि पाणीटंचाईवर उपाय करण्यासाठी राबविला जातो. Jaltara Scheme
जलतारा पद्धतीमध्ये शेतातील योग्य जागेवर पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी विशेष शोषखड्डा तयार केला जातो. हा खड्डा दगड, खडी आणि गोट्यांच्या थरांनी भरला जातो. त्यामुळे पाणी कमी झिरपणाऱ्या वरच्या मातीच्या थरातून खाली जाऊन भूजल पुनर्भरणास मदत करते. Jaltara Scheme
जलतारा खड्ड्याचे साधारण माप
लांबी: 5 फूट
रुंदी: 5 फूट
खोली: 6 फूट
भरण: वेगवेगळ्या आकाराचे दगड व खडी
प्रत्यक्ष माप व जागा स्थानिक तांत्रिक मार्गदर्शनानुसार ठरवावी.

जलतारा योजनेचे फायदे
> पावसाचे पाणी शेतातच मुरण्यास मदत होते.
> भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकते.
> विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता सुधारू शकते.
> अतिवृष्टीमुळे शेतात साचणारे पाणी आणि पिकांचे नुकसान कमी करण्यास मदत होते.
> रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता वाढते.
हे फायदे जमिनीचा प्रकार, भूगर्भातील खडकांची रचना, पावसाचे प्रमाण आणि खड्ड्याची योग्य जागा यांवर अवलंबून असतात.
शासना कडून मिळणार अनुदान?
महाराष्ट्र शासनाकडून व्हीबी-जी राम-जी योजना अंतर्गत जलतारा प्रकल्पा साठी अनुदान देण्यात येत आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना एकरी 1 जलतारा घेता येतो आणि यास रोजगार हमी योजना मध्ये मजुरी देखील देण्यात येते.
एक जलतारा साठी अनुदान
मजुरी रक्कम : 4500/-
साहित्य : 500/-
एकूण : 5000/-
आवश्यक कागदपत्रे
- सात बारा उतारा
- 8 अ होल्डींग
- आधार
- बँक पासबूक
- जॉब कार्ड
अर्ज कुठे करावा
जल तारा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज हा ग्रामपंचायत कार्यालय किंवा तुमच्या गावातील ग्राम रोजगार सेवक यांच्या कडे सादर करू शकता. पुढे ते तुमचा अर्ज कार्यान्वयीन यंत्रणा – पंचायत समिति कडे सादर करून त्याचा वर्क कोड तयार करून घेतील आणि त्यानंतर कामला सुरुवात करण्याचे काळवतील.
