Agrim Anudan : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना 5000 रुपयांची अग्रीम मदत दिवाळीपूर्वी (Diwali 2026) देण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पैसे शेतकऱ्यांना मिळतील. मात्र, आता यापैकी 5000 रुपये शेतकऱ्यांना आगाऊ देण्यात येणार आहेत. या मदतीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, असे राज्य सरकारला वाटते. (Maharashtra Drought)
आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5000 रुपयांची अग्रीम मदत दिवाळीपूर्वीच देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. येत्या गुरुवारपर्यंत राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 7500 हजार कोटी रुपये जमा होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र, शेतीचे पंचनामे होऊन मदत येईल तेव्हा येईल, पण शेतकऱ्यांची दिवाळी गोड जावी म्हणून 5000 रुपयांची अग्रीम मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. Agrim Anudan
कुणाला मिळणार अनुदान ?
ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 पाठवले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, त्यांची केवायसी तपासून मदत केली जाणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना भीती होती की, बँका मदतीचे पैसे आल्यावर थकित कर्जाचे पैसे कापून घेतील. पण आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही बँक पैसे कापून घेणार नाही, असे बँकांना स्पष्ट आदेश द्या, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. Agrim Anudan
