कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून भरघोस वाढ | Agricultural Awards for Farmers

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Agricultural Awards : शेती व शेती पूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारात लाखो रुपयांची वाढ करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे.

Agricultural Awards

 

कृषि पुरस्कार मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काराच्या रक्कम 75000/- वरुण 3,00,000/- करण्यात आली आहे.

तसेच वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषी भूषण, वसंतराव नाईक शेती मित्र यासह अन्य पुरस्कारांच्या रकमेतही दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाने याबाबतचा शासन आदेश काढले आहेत. Agricultural Awards

 

कृषी विभागाकडून महत्त्वाचा दिला जाणारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराचे सध्याचे स्वरूप सन्मानचिन्ह व ७५ हजार रुपये रोख हे होते परंतु आता यामध्ये वाढ करून पुरस्काराची रक्कम ३ लाख रुपये करण्यात आली आहे. Agricultural Awards

 

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराची सध्याची रक्कम 50 हजार रुपये आहे. यामध्ये 2 लाखांपर्यंत भरीव वाढ केली आहे. या पुरस्कारांची संख्या ८ इतकी आहे. जिजामाता कृषी भूषण पुरस्काराची रक्कम 50 हजारांवरून 2 लाखांपर्यंत वाढविली आहे. या पुरस्कारांची संख्या 5 इतकी आहे.

 

कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्काराची रक्कमही 50 हजारांवरून 2 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या पुरस्कारांची संख्या 8 इतकी आहे. वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्काराची रक्कम 30 हजार इतकी आहे. ती आता 1,20,000/- पर्यंत वाढविण्यात आली आहे. या पुरस्काराची संख्या 3 इतकी आहे.

 

युवा शेतकरी पुरस्काराची रक्कमही 30 हजाराहून 1 लाख 20 हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या पुरस्कारांची संख्या 8 आहे. उद्यानपंडित पुरस्कारासाठी रक्कम 50 हजाराहून 2 लाख करण्यात आली आहे. या पुरस्कारांची संख्या 8 इतकी आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गटासाठी 11 हजार इतकी पुरस्काराची रक्कम होती. ती आता 44 हजार इतकी केली आहे. या पुरस्कारांची संख्या 34 इतकी आहे. Agricultural Awards

 

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट या पुरस्काराची रक्कमही 11 हजारांवरून 44 हजार केली आहे. या पुरस्कारांची संख्या 6 इतकी आहे. पुरस्कारार्थींना पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरीता द्यावयाच्या दैनिक व प्रवास भत्त्याच्या रकमेत वाढ केली असून, दैनिक व प्रवास भत्त्याची रक्कम प्रति पुरस्कारार्थी 15 हजार इतकी करण्यात आली आहे.

 

अधिक वाचा :


*
कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

error: Content is protected !!