Mahaurja Kusum : सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक | अशी घ्या काळजी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

मागील दोन वर्षांपासून राज्यातील शेतकरी हे कुसुम सोलर पंप Mahaurja Kusum साठी महाऊर्जा च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत आहेत. परंतु, शेतकर्‍यांची दिशाभूल करण्यासाठी काही बनावट वेबसाइट करून शेतकर्‍यांची फसवणूक होताना दिसत आहे. तर, सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की कुसुम सोलर पंप योजना ही महा ऊर्जा या विभागाकडून राबविण्यात येते आणि या विभागाचे फक्त एकच अधिकृत संकेतस्थळ आहे (www.mahaurja.com)  

Mahaurja Kusum Fraud

 

सध्या लाभार्थ्यांच्या काही याद्या ह्या आधार आणि मोबाइल क्रमांक सहित सोशल मीडिया वरती प्रसारित झालेल्या आहेत. यामध्ये मोबाइल क्रमांक असल्यामुळे त्या शेतकर्‍यांना SMS किंवा कॉल करून आपली निवड झाली असून आपण पेमेंट करावे असे सांगितल्या जात आहे. तर, सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावे की या योजनेमध्ये अगोदर आपल्या शेताचा सेल्फ सर्वे करावा लागतो आणि तो सर्वे हा महाऊर्जा च्या अधिकृत मोबाइल अॅप्लिकेशन द्वारेच करता येतो आणि त्यानंतर तुम्हाला त्याच अधिकृत अॅप्लिकेशन मध्ये पेमेंट ऑप्शन येत असते. परंतु, सध्या लाभार्थ्यांचे मोबाइल क्रमांक सहित याद्या प्रसारित झाल्यामुळे शेतकर्‍यांना बनावट वेबसाइट आणि अॅप्लिकेशन किंवा लिंक पाठवून पेमेंट करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत तर यासाठी कोणीही कोठे पेमेंट करू नये आणि आपल्याला पेमेंट ऑप्शन /सेल्फ सर्वे संदेश आला असेल तर आपण महाऊर्जा च्या आपल्या जिल्ह्यातील कार्यालयात जाऊन विचारपूस करून च निर्णय घ्यावा. (Mahaurja Kusum)

 

 

तर, शेतकरी बांधवानो असा कोणताही पेमेंट करण्या विषयी आपल्याला संदेश आला असेल तर आपण अगोदर आपल्या महाऊर्जा जिल्हा कार्यालयात संपर्क करून कन्फर्म करावे आणि त्यानंतर निर्णय घ्यावा. (Mahaurja Kusum)

 

 

महाऊर्जा विभागाचे अधिकृत संकेतस्थळ : लिंक

 

महाऊर्जा विभागाचे अधिकृत मोबाइल अॅप्लिकेशन  : लिंक

तर, महाऊर्जा विभागाने खालील सूचना जाहीर केली आहे : Mahaurja Kusum

 

प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावाखाली फसव्या वेबसाईट पासून सावध रहा

शासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक बनावट वेबसाईट आणि मोबाईल एप्लिकेशन दारे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधानमंत्री -कुसुम योजना Mahaurja Kusum) च्या नावाने शेतकऱ्यांकडून सौर पंप बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नोंदणी शुल्क आणि पंपाची किंमत ऑनलाईन भरण्यास सांगितले जात आहे. यापैकी काही बनावट वेब-साईट डोमेन नावे त्यामुळे प्रधानमंत्री-कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी फसव्या वेब-साईट वर जावू नये आणि कोणतेही शुल्क भरु नये. प्रधानमंत्री-कुसुम योजना राज्य शासनाच्या महाऊर्जा मार्फत राबविण्यात येत आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे (MEDA)च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या www.mahaurja.com किंवा ०२०-३५०० ०४५० वर संपर्क साधावा.

 

 

तर, शेतकरी बांधवानो या संकेतस्थळावर जी माहिती आणि याद्या दिल्या जातात ह्या आपल्या माहिती साठी असतात परंतु यामध्ये आम्ही कोणतेही मोबाइल क्रमांक किवा संवेदन शील इतर माहिती या ठिकाणी देत नाहीत. तर, आपण सर्वांनी आवश्यक काळजी घेऊन आपल्याला काही पेमेंट विषयी कॉल किंवा संदेश येत असतील तर आपण पडताळणी साठी आपल्या जिल्ह्याच्या महाऊर्जा कार्यालयात संपर्क करून पडताळणी करूनच निर्णय घ्यावा. 

 

अधिक वाचा :

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

* “या” जिल्ह्यातील 93 महसूल मंडळ पीक विमा अग्रिम साठी पात्र

* राज्यातील या तालुक्यांत दुष्काळ जाहीर

* या दिवशी मिळणार 15 वा हाफता

error: Content is protected !!