Mahavitaran Solar Pump : महावितरण चे कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू | हे शेतकरी आहेत पात्र | येथे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
1/5 - (1 vote)

राज्यामध्ये कुसुम सौर पंप योजना प्रमाणेच आता महावितरण (Mahavitaran Solar Pump) कडून देखील शेतकर्‍यांना सोलर पंप देण्यात येणार आहेत आणि यासाठी आता महावितरण कडून नवीन पोर्टल तयार करण्यात आले असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. परंतु, महावितरण कडून सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत त्या आपण येथे पाहू.

 

Mahavitaran Solar Pump

 

राज्यातील शेतकर्‍यांना कुसुम योजने प्रमाणे महावितरण कडून 1 लाख कृषि सौर पंप वितरण करण्याचे नियोजन आहे तर यासाठी आता महावितरण कडून नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे आणि त्याची लिंक ही आपल्याला खाली दिलेली आहे. परंतु, महावितरण कडून जर आपल्याला कृषि सोलर पंप चा लाभ घ्यायचा असेल तर खालील प्रमाणे अटी आहेत. (Mahavitaran Solar Pump)

 

 

 

महावितरण सौर कृषि पंप पात्रता (Mahavitaran Solar Pump)

 

जे शेतकरी हे विजेच्या जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांनी महावितरण कडे पैसे भरून प्रतीक्षा यादी मध्ये आहेत ते शेतकरी सौर कृषि पंप घेण्यासाठी पात्र असतील.

 

सूचना : आपण जर यापूर्वी कुसुम योजना अंतर्गत सौर पंप साठी अर्ज केला असेल तर आपल्याला या ठिकाणी अर्ज करताना आपला आधार क्रमांक यापूर्वी कुसुम साठी नोंदणी केली आहे असे दाखवेल. तर, आपण नवीन नोंदणी त्या आधार क्रमांक वरती करता येणार नाही. (Mahavitaran Solar Pump)

 

 

 

 नोंदणी कुठे आणि कशी करावी?

 

आपण जर विद्युत जोडणी साठी कोटेशन भरले असेल आणि आपण प्रतीक्षा यादी मध्ये असाल तर आपण विद्युत जोडणी एवजी सौर कृषि पंप घेण्यास इछुक असाल तर आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपण आपला ग्राहक क्रमांक टाकून ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. (Mahavitaran Solar Pump)

 

  1. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण “ पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का ?” येथे Yes बटन वरती क्लिक करावे
  2. त्यानंतर आपल ग्राहक क्रमांक तेथे टाकावा आणि शोधा पर्याय वरती क्लिक करावे.
  3. त्यानंतर आपली सविस्तर माहिती दाखविली जाईल
  4. पुढे आपली सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज सबमिट करा आणि त्यानंतर आपल्याला एक यूजर आयडी आणि पासवर्ड आपल्या मोबाइल वरती पाठविण्यात येईल.
  5. पुढे आपल्याला परत खालील लिंक वर आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे आणि आपला फॉर्म पूर्ण भरून कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावयाचा आहे.

 

 

नोंदणी करण्यासाठी : येथे भेट द्या

 

 

नोंदणी केल्यानंतर लॉगिन करण्यासाठी : येथे भेट द्या

 

 

अधिक वाचा :

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक

* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान

* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस

* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात

* विमा अग्रिम पासून हे शेतकरी राहणार वंचित?

* 15 वा हफ्ता मिळाला का? येथे पहा

* पीक विमा अग्रिम मिळाला नाही? येथे पहा

* आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे हे कसे पहावे?

* राज्यातील 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

error: Content is protected !!