आज दिनांक 29 मार्च रोजी, शेतकरी कर्जमाफी विषयी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आले आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री मा . चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमा समोर महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे. (Farmer Loan Waiver Maharashtra)
राज्य शासनाने २०२६ च्या अर्थसंकल्पी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे. याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत आहेत. अशा शेतकऱ्यांना देखील ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Farmer Loan Waiver Maharashtra)
महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले की, प्रवीण परदेशी समिति कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया राबवणार आहे. यामध्ये 2 लाख रुपयांची कर्जमाफी कशी- कशी असणार आहे. राज्यातील अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक शेतकरी कर्जमाफीची गरज आहे. त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, याकरिता एसओपी तयार होत आहे.
ते पुढे म्हणाले, धन दांडग्या लोकांना ज्यांच्याकडे गाडी, बंगला आहे, फार्म हाऊस आहे, अशा लोकांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे, असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला. ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे, अशा शेतकऱ्यांची SOP तयार करणे चालू आहे. या प्रक्रियेसाठी थोडा उशीर होईल, मात्र कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. (Farmer Loan Waiver Maharashtra)
कर्जमाफी कोणाची होणार ?
दरम्यान या कर्जमाफी मध्ये कोण पात्र, कोण अपात्र होणार याबाबत अद्यापही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमता आहे. कारण कर्जमाफी विषयीची निकषता शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक अभ्यास गट समिती नेमण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा अहवाल सादर केल्यानंतर ही कर्जमाफी कोणाची होणार आहे हे निश्चित होणार आहे. कर्जमाफी किचकट प्रक्रियेच्या माध्यमातून राबवली जाईल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे.
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
