Posted in

Farmers Foreign Study Tour : शेतकर्‍यांना बाहेरच्या देशात जाण्याची संधि | मिळणार 2 लाख अनुदान | शेतकर्‍यांचे परदेश अभ्यासदौरे

Farmers foreign study tour
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (3 votes)

महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी विभागाने “शेतकऱ्यांचे परदेश अभ्यासदौरे” ही नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांना परदेशात जाऊन तेथील शेती विषयी माहिती मैळणार आहे परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच, शेतकऱ्यांना इस्रायल, नेदरलँड आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये जाण्याची सुवर्ण संधी मिळणार असून त्यांना शेती तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची व शिकण्याची संधी मिळणार आहे. (Farmers Foreign Study Tour)

 

शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी अनेकदा पैशाची कमतरता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकायची इच्छा असूनही विदेश भेटी देता येत नाहीत. ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या योजनेतून दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या अर्ध्या रकमेचे अनुदान मिळते म्हणजे 50% किंवा जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते. या योजनेमुळे छोटे आणि कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण घेणे आता यापुढे सोपे होणार आहे. (Farmers Foreign Study Tour)

 

परदेशदौरे योजनेचा उद्देश (Farmers Foreign Study Tour)

 

शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून राज्यातील शेती विकासाला नवी दिशा मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे. Farmers Foreign Study Tour

 

योजनेचे फायदे

 

> या योजनेअंतर्गत दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल २ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते.

> या दौऱ्यात शेतकऱ्यांना ड्रोन व डेटा आधारित शेतीचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाईल.

> अचूक सिंचन पद्धतींबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल.

> आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थांना भेट देण्याची संधी मिळेल.

> शेतकऱ्यांना तेथील शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधता येईल.

> जागतिक बाजारपेठ आणि निर्यात प्रक्रियेची माहिती दिली जाईल.

> स्मार्ट फार्मिंग तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाईल.

> शेतीतील खर्च कमी करून उत्पादन कसे वाढवावे याचे मार्गदर्शन केले जाईल.

> आधुनिक अवजारे आणि पाण्याचा कार्यक्षम वापर शिकवला जाईल.

> शेतीमालाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित केली जातील.

> शेतकऱ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल. Farmers Foreign Study Tour

 

 

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

 

> शेतकऱ्याचा वैध पासपोर्ट (किमान ३ महिन्यांची वैधता).

> चालू ७/१२ व ८‑अ उतारा.

> शेती उत्पन्नाचे मुख्य साधन असल्याचे स्वयंघोषणापत्र (प्रपत्र १).

> अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी.

> शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रांची प्रत.

> शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे एमबीबीएस डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र.

> स्वयंघोषणापत्र – नोकरी, डॉक्टर, वकील, सीए, इंजिनीयर, कंत्राटदार इ. नसल्याचे आणि यापूर्वी शासकीय खर्चाने परदेश दौरा न केल्याचे.

> लाभार्थी स्वतः शेतकरी असावा आणि प्रगतशील असावा. Farmers Foreign Study Tour

> शेती हेच मुख्य उत्पन्नाचे साधन असावे आणि त्याबाबत स्वयंघोषणापत्र (प्रपत्र १) देणे आवश्यक आहे.

> स्वतःच्या नावावर चालू कालावधीचा ७/१२ व ८‑अ उतारा असावा.

> अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.

> शेतकऱ्याची कृषी विभागामार्फत निवड झालेली असावी.

> मागील ३ ते ५ वर्षांत परदेश अभ्यासदौरा केलेला नसावा.

> शेतकऱ्याचे वय किमान २५ वर्षे असावे.

> शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा आणि एमबीबीएस डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

> शेतकरी वैध पासपोर्टधारक असावा आणि पासपोर्टची किमान ३ महिन्यांची वैधता असावी.

> शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खाजगी नोकरीत नसावा.

> डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार इ. व्यवसायांत असलेला नसावा; याबाबत वेगळे स्वयंघोषणापत्र देणे आवश्यक आहे

> यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेतून शासकीय अर्थसाहाय्याने परदेश दौरा केलेला नसावा. Farmers Foreign Study Tour

 

 

अर्ज प्रक्रिया

 

इच्छुक शेतकऱ्यांनी निर्धारित अर्ज नमुना भरावा व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज कृषी विभागाकडे सादर करावा. अर्जांची छाननी संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जाईल त्यानंतर पात्र अर्जदारांची यादी तयार करून पुढील निवड प्रक्रिया राबवली जाईल.  निवड झालेल्या शेतकऱ्यांना अधिकृत पत्राद्वारे कळवले जाईल. तसेच अंतिम निवड अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राहतील.  Farmers Foreign Study Tour

 

 

हे पण पहा :

 

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान मिळणार

* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

error: Content is protected !!