Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या फेब्रुवारी २०२६ चा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंगळवारी दि 24/03/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे या योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Ladki Bahin Yojana)
सरकारने प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार, ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी २०२६ चा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारकडून २७७ कोटी २६ लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिला जाणार आहे. तसेच, प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे आता हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली आहे. (Ladki Bahin Yojana)
फक्त पात्र लाभार्थी महिलांनाच मिळणार हप्ता (Ladki Bahin Yojana)
एकीकडे निधी मंजूर झाला असला, तरी दुसरीकडे सरकारने अर्जांची कडक पडताळणी सुरूच ठेवली आहे. कागदपत्रांची सूक्ष्म छाननी केल्यानंतर राज्यभरात आतापर्यंत सुमारे ७० ते ८० लाख अर्ज अपात्र ठरवून बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आपला अर्ज नेमका कोणत्या कारणामुळे बाद झाला, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, या योजनेचा लाभ केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच देण्यात येणार असून, यापुढील सर्व हप्तेही फक्त पात्र लाभार्थींनाच वितरित केले जाणार आहेत. Ladki Bahin Yojana
कधी मिळणार हफ्ता?
या योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. कारण, महिला व बाल विकास मंत्री मा. आदिती तटकरे यांनी महत्वाचे अपडेट दिले आहे ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधि वितरणाची प्रक्रिया ही आज दिनांक 27 मार्च 2026 पासून सुरू करण्यात आलेली आसून पुढील 2 ते 3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिला यांच्या आधार संलग्न बँक खात्या मध्ये हा सन्मान निधि जमा होणार आहे. Ladki Bahin Yojana

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?
