MahaDBT Review : कृषि विभाग घेणार महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत पद्धती बाबत शेतकर्यांचा अभिप्राय …. Lottery System
MahaDBT Review : कृषि यांत्रिकीकरणाच्या सध्याच्या सोडत पध्दत किंवा प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या पध्दतीचा अवलंब करण्यासाठी शेतक-यांकडुन अभिप्राय मागविण्याचा निर्णय कृषि विभागाने घेतला आहे. तशा सुचना कृषि आक्तालयामार्फत प्राप्त झालेल्या आहेत. त्या अभिप्रायानंतर या योजनेच्या अंमलवजावणी कोणत्या पध्दतीने आगामी काळात करायची, यावरील पुढील निर्णय मंत्रालयस्तरावरुन घेण्यात येणार आहे.
राज्यातील कृषि यांत्रिकीकरण योजनेत शेतकर्यांना सोडत पध्दतीत महाडीबीटी महाआयटी या संकेतस्थळावर कधीही अर्ज करता येतो. आलेल्या अर्जामधुन निघणार्या लॉटरीमधुन लाभार्थी शेतकर्यांची निवड केली जाते. मात्र कृषि मंत्री मा माणिकराव कोकाटे यांच्या भेटीत शेतकर्यांकडून कृषि यांत्रिकीकरणाच्या सध्याच्या लॉटरी पध्दती एवजी प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (MahaDBT Review)
त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील शंभर शेतक-यांकडुन अभिप्राय मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शेतकर्यांची कृषि यांत्रिकीकरणात सध्याची सोडत पद्धत योग्य आहे का? यावर होय किंवा नाही असे उत्तर देणे अपेक्षित आहे. तसेच या व्यतिरिक्त सोडत पद्धत प्राध्यान्यांनी राबवावी या बाबतचा अभिप्राय घेतला जाणार आहे तसेच शेतक-यांचे काही नविन अभिप्राय असल्यासही कळवायचे आहेत. (MahaDBT Review)
कृषि यांत्रिकीकरणाबाबतच्या सोडतीवर शेतक-यांचे अभिप्राय मागविण्यात येत आहेत. तरी शेतक-यांनी आपला अभिप्राय आपल्या गावचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक , मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात नोंदविण्यात यावेत असे आवाहन कृषि विभागा यांच्याकडून करण्यात आले आहे.
तर, राज्यातील शेतकर्यांनी आपणास काय हवे आहे म्हणजे रॅन्डम पद्धतीने आलेल्या अर्जा मधून सोडत किंवा प्रथम अर्ज करणार्यास प्रथम प्राधान्य या पैकी एक पर्याय आपण कृषि विभागाला कळवावा.
शेतकरी अभिप्राय नमूना (MahaDBT Review)
अशाच नवीन अपटेड मिळविण्याकरिता ग्रुप ला जॉइन व्हा
* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता
* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार
* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज
* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?
* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस
* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…
* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?
* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती