MahaDBT Token Yantra: महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

“महाडीबीटी – शेतकरी योजना” बद्दल

MahaDBT Token Yantra: शेतकरी बांधवानो, आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत होतो. परंतु, शेतकरी बांधवानो आता  कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये सर्व लाभ घ्यावयाच्या बाबी नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केले आहे.

MahaDBT Token Yantra

 

महाडीबीटी पोर्टल वर एका पेक्षा अधिक बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, इत्यादि बाबींचा अर्ज करता येतो. आणि यामध्ये आपण मनुष्य चलित टोकन यंत्र (MahaDBT Token Yantra) साठी देखील अर्ज करू शकता आणि यासाठी कृषि विभागाकडून 50% अनुदान देखील दिले जाते.

 

टोकन यंत्र

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि विभागामार्फत टोकन यंत्र (MahaDBT Token Yantra) साठी अनुदान देय आहे. हे टोकन यंत्र मनुष्यचलित आहे या यंत्राच्या सहाय्याने आपण सोयाबीन, हरभरा, मका, इ. पिके लागवड करू शकतो. हे यंत्र शेतकर्‍यांसाठी अतिशय उपयोगी आहे आणि वापरण्यास देखील सोयिस्कर आहे. तर, जे शेतकरी बांधव हे यंत्र घेऊ इच्छित आहेत त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावा आणि कृषि विभागाकडून देण्यात येणार्‍या अनुदानाचा फायदा घ्यावा.

 

टोकन यंत्र अनुदान

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे मनुष्य चलित टोकन यंत्र साठी खालील प्रमाणे अनुदान देय आहे.

लहान सीमान्त शेतकरी/अल्पभूधारक : किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु.10,000/-

बहुभूधारक शेतकरी : किंमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त रु.8,000/-

वरील प्रमाणे अनुदान देय आहे.

अनुदानावरती टोकन यंत्र (MahaDBT Token Yantra) खरेदी करताना त्या टोकण यंत्राचा टेस्ट रीपोर्ट असणे आवश्यक आहे आणि तसेच ज्या विक्रेत्याकडून आपण यंत्र खरेदी करणार आहोत त्यांच्याकडे ते यंत्र विकण्यासाठी डीलरशिप प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे.

 

टोकन यंत्र असा करा अर्ज

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे मनुष्य चलित टोकन यंत्र (MahaDBT Token Yantra) साठी खालील दिलेल्या पद्धतीने महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करा.

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती :

 

स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे (mahadbt login)

Mahadbt farmer login krishi vibhag

 

स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा

Sugarcane Harvester MahaDBT Farmer 2

 

 

स्टेप 3: कृषि यांत्रिकीकरण ही बाब निवडावी

COMPONENETS

 

 

स्टेप 4: तपशील मध्ये मनुष्य चलित औजारे

टोकण यंत्र

 

 

स्टेप 5: यंत्र सामग्री मध्ये टोकन यंत्र हा पर्याय निवडा

स्टेप 6: मशीनचा प्रकारा टोकन यंत्र हा निवडा

स्टेप 7: अर्ज जतन करावा

स्टेप 8: मुख्य पृष्ठ वरती यावे

स्टेप 9: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा

स्टेप 10: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा

वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर मनुष्य चलित टोकन यंत्र साठी अर्ज सादर करू शकता.

अर्ज सादर केल्यानंतर कृषि यांत्रिकीकरण सोडत साठी अर्ज विचारात घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला त्याच्या मोबाईल संदेशवद्वारे सूचित करण्यात येईल.

निवड झाल्यानंतर अपलोड करावयची कागदपत्रे

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर टोकण यंत्र साठी सोडत मध्ये निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  1. सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
  2. आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
  3. टोकन यंत्राचा अधिकृत टेस्ट रीपोर्ट
  4. टोकन यंत्राचे कोटेशन
  5. विक्रेत्याचे डीलरशिप प्रमाणपत्र

 

पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे

टोकन यंत्र साठी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्या कागदपत्रांची ऑनलाइन छाननी केली जाईल आणि कागदपत्रे योग्य असतील तर त्या लाभार्थ्याला ते यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्व संमती देण्यात येईल. पूर्व संमती मिळाल्यानंतर लाभार्थी शेतकरी यांनी ते यंत्र खरेदी करून खालील कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावीत. (MahaDBT Token Yantra)

  1. आरिजिनल बिल/ GST बिल
  2. आरटीजीएस (RTGS) पावती
  3. यंत्राचे डिलीव्हरी चलन

वरील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करावीत.

 

 

अधिक वाचा :

* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा

* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण

* “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता

* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?

error: Content is protected !!