Posted in

Mini Oil Mill : महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?

Mahadbt Schemes

 

Mini Oil Mill Extractor : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर एका पेक्षा अधिक बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, व इतर शेती साधन सामग्री बाबींचा अर्ज करता येतो आणि यामध्ये आपण पोर्टल वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी देखील अर्ज करू शकता आणि यासाठी कृषि विभागाकडून 50% अनुदान देखील दिले जाते.

 

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि विभागामार्फत तेलघाणा/मिनी ऑइल मिल (Mini Oil Mill) साठी अनुदान देय आहे. हे तेलघाणा/मिनी ऑइल मिल आपण भुईमूग, करडई, तीळ, खोबरे इत्यादि बियाणे पासून तेल काढण्यासाठी उपयोगात येते.  तर, जे शेतकरी बांधव हे तेलघाणा/मिनी ऑइल मिल घेऊ इच्छित आहेत त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावा आणि कृषि विभागाकडून देण्यात येणार्‍या अनुदानाचा फायदा घ्यावा.

 

तेलघाणा/मिनी ऑइल मिल अनुदान (Mini Oil Mill)

महाडीबीटी पोर्टल द्वारे तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी खालील प्रमाणे अनुदान देय आहे.

1. लहान सीमान्त शेतकरी/अल्पभूधारक : किंमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु.1,80,000/- 

2. बहुभूधारक शेतकरी : किंमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त रु.1,44,000/-

 प्रमाणे अनुदान देय आहे.

ऑनलाइन सोडत मध्ये निवड झाल्यानंतर तेलघाणा/मिनी ऑइल मिल (Mini Oil Mill) खरेदी करताना त्या मिल चा वैध टेस्ट रीपोर्ट असणे आवश्यक आहे आणि तसेच ज्या विक्रेत्याकडून आपण खरेदी करणार आहात त्यांच्याकडे ते विकण्यासाठी डीलरशिप प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे.

तेलघाणा/मिनी ऑइल मिल ऑनलाइन अर्ज 

महाडीबीटी पोर्टल द्वारे तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी खालील दिलेल्या पद्धतीने महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करा.

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती :

स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे (mahadbt login)

स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा

स्टेप 3: कृषि यांत्रिकीकरण ही बाब निवडावी

स्टेप 4: तपशील मध्ये प्रक्रिया संच बाब निवडावी

स्टेप 5: यंत्र सामग्री मध्ये एक्स्ट्राक्टर (सर्व फळे/अन्नधान्य/गळीतधान्य) निवडावे

Mini Oil Mill Oil Mill Extractor

स्टेप 6: संमती साठी चेक बॉक्स वरती क्लिक करावे

स्टेप 7: अर्ज जतन करावा

स्टेप 8: मुख्य पृष्ठ वरती यावे

स्टेप 9: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा

स्टेप 10: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा

वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी अर्ज सादर करू शकता.

अर्ज सादर केल्यानंतर आपला अर्ज हा जिल्ह्याच्या लक्षांक नुसार सोडत साठी विचारात घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला त्याच्या मोबाईल संदेश द्वारे निवड बाबत सूचित करण्यात येईल.

Tags: mini oil mill extractor machine subsidy mahadbt farmer schemes, mahadbtfarmer, oil extraction unit subsidy,