Mahadbt Sprinkler Subsidy : महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Mahadbt Sprinkler Subsidy : शेतकरी बांधवानो आता  कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात ये जा करण्याची गरज नाहीये, किंवा कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करता येईल,  यासाठी शासनाने महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केलेले आहे.

 

Mahadbt Sprinkler Subsidy

 

 

महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टल वर आपण कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. यासाठी सुरूवातीला आपल्याला महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी नोंदणी करणे आवश्यक असते. ती नोंदणी केल्यानंतर आपण विविध योजना साठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. (Mahadbt Sprinkler Subsidy)

 

 

 

सध्या रब्बी हंगाम मध्ये राज्यातील शेतकर्‍यांना तुषार सिंचन ची आवश्यकता असते. तर या तुषार सिंचन (Mahadbt Sprinkler Subsidy) साठी देखील आपण महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करू शकता आणि या घटकासाठी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू आहे. तरी, इच्छुक शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज सादर करून घ्यावेत.

 

 

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना  – तुषार सिंचन (Mahadbt Sprinkler Subsidy)

 

सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे, तसेच पाण्याचा कार्यक्षम वपा होऊन उत्पादनात वाढ व्हावी म्हणून प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना 80% अनुदान वरती तुषार आणि ठिबक सिंचन उपलब्ध करून दिले जाते.

 

 

पात्र लाभार्थी

 

सर्व खातेदार शेतकरी हे या योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 

 

आवश्यक कागदपत्रे

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे: (Mahadbt Sprinkler Subsidy)

 

  1. सात बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
  2. आठ अ- होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत, उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)
  3. अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र
  4. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
  5. वैध जात प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)

 

 

अनुदान

 

अल्प व अत्यल्प भूधारक ( 2 हे पेक्षा कमी) शेतकर्‍यांना 80% तर इतर बहू भूधारक शेतकर्‍यांना 75% अनुदान देय आहे.  प्रधानमंत्री कृषि सूक्ष्म सिंचन योजना अंतर्गत 55/45% तर उर्वरित 25/30% हे मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत दिले जाते.

 

म्हणजेच, तुषार संच साठी शेतकर्‍यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत 13306/- (55%)  आणि मुख्यमंत्री शास्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत 6048/- (25%) असे एकूण रु. 19354/- अनुदान देण्यात येते.

 

 

क्षेत्र निहाय अनुदान बदल

 

तुषार संच साठी शेतकर्‍यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत 13306/- (55%)  आणि मुख्यमंत्री शास्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत 6048/- (25%) अनुदान देण्यात येते. तर, यापूर्वी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत शेतकर्‍यांना 1 हे क्षेत्र पर्यन्त रु. 13306/- असे अनुदान दिल्या जात होते.

 

 

परंतु, आता कृषि आयुक्तालया च्या 05 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रका नुसार लाभार्थ्याने अर्जा मध्ये नमूद केलेल्या क्षेत्रा नुसार अनुदान परिगणणा करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज सादर करत असताना लाभार्थ्यकडे क्षेत्र असेल तर किमान 1.00 हे साठी अर्ज सादर करावा किंवा क्षेत्र कमी असेल तर जेवढे असेल तेवढे अर्जा मध्ये नमूद करावे. कारण, आता यापुढे अनुदान परीगणना ही क्षेत्र नुसार करण्यात येणार आहे. (Mahadbt Sprinkler Subsidy)

 

 

उदाहरण : एका शेतकर्‍याचे तुषार संच 75 एमएम साठी अर्जा नुसार प्रस्तावित क्षेत्र हे 0.40 हे असे आहे तर त्या शेतकर्‍याला केंद्र सरकार च्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे 7266/- इतके अनुदान देय असेल आणि हेच क्षेत्र जर 1.00 हे प्रस्तावित असेल तर अनुदान रक्कम ही 13306/- इतकी असेल.

 

 

 

अर्ज करताना ही काळजी घ्या? MahaDBT Farmer

 

तर, तुषार संच साठी आता Pro rata basis वरती अनुदान परिगणणा करण्यात येणार असल्यामुळे शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत. (Mahadbt Sprinkler Subsidy)

 

 

1. महाडीबीटी वर आपले असलेले सर्व गट क्रमांक आणि क्षेत्र हे जमीन तपशील मध्ये नोंदवावे

2. अर्ज करताना आपल्याकडे 1 हे पेक्षा अधिक क्षेत्र असेल तर तुषार संच साठी प्रस्तावित क्षेत्र हे किमान 1.00 हे टाकावे.

3. आणि एकूण क्षेत्र च जर 1.00 हे पेक्षा कमी असेल तर जेवढे क्षेत्र आहे ते संपूर्ण क्षेत्र तुषार संच साठी प्रस्तावित करावे.

 

 

ऑनलाइन अर्ज

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपण महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर भेट द्यावी किंवा आपण आपल्या जावळी महा ई सेवा केंद्र ला भेट देऊ शकता.

 

महाडीबीटी शेतकरी योजना : पोर्टल ला भेट द्या

 

 

Tags : Mahadbt_Sprinkler_Subsidy, mahadbt_farmer_shcemes, maharashtra_gov_farmer_shcemes, pmksy_sprinkler_irrigation_scheme, mahadbt_subsidy,

 

 

हे पण पहा :

 

* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* कृषि विद्यापीठाचे नवीन हरभरा वाण विक्रीस उपलब्ध | परभणी चना-16

* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?

* रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!