Parbhani Chana-16 : कृषि विद्यापीठाचे नवीन हरभरा वाण विक्रीस उपलब्ध | परभणी चना-16

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.7/5 - (3 votes)

Parbhani Chana-16 : रब्बी हंगाम 2024-25 ला सुरवात झाली असून शेतकरी हरभरा, गहू पिकाला अधिक प्राधान्य देत आहेत. तसेच, सर्व जिल्ह्यांमध्ये रब्बी च्या पेरणी सुरू झालेल्या आहेत. रब्बी मध्ये शेतकरी हरभरा, गहू यांचे नवीन वाण लागवड करण्यास इच्छुक असतात त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण, परभणी कृषि विद्यापीठाने हरभरा नवीन वाण विकसित केला आहे.

 

Parbhani Chana 16 परभणी चना 16 हरभरा वाण

 

विद्यापीठाने (VNMKV parbhani) विकसित केलेला हरभरा चना-१६ या वाणाचा भारताच्या राजपत्रात समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच या वाणाचा प्रसार करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हा वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने आवाहन केलंय की, सर्व शेतकरी बीजोत्पादक कंपनी / शेतकरी बीजोत्पादक गट यांना कळविण्यात येते कि, कुलगुरू, वनामकृवि, परभणी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार वनामकृवि, परभणी या विद्यापीठाने प्रसारित केलेल्या हरभरा पिकाचे नवीन वाण परभणी चना-१६ (Parbhani Chana-16) या वाणाचा प्रसार महाराष्ट्र राज्य व मराठवाडा विभागातील सर्व शेतकरी बांधव यांच्यापर्यंत व्हावा, याकरिता सदरील वाणांचे १ किलो बियाणे प्रायोगिक तत्वावर देण्याचे ठरविले आहे. (Parbhani Chana-16)

 

 

त्यामुळे सर्वाना विनंती करण्यात येते कि, ज्यांना सदरील वाणांचे बियाणे प्रायोगिक तत्वावर पाहिजे असल्यास त्यांच्या करिता सदरील वाणाचे बियाणे हे बीज प्रक्रिया केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे रु १०० रुपये प्रति किलो दराने विक्रीस उपलब्ध आहे.

 

 

परभणी चना – १६  (Parbhani Chana-16)

 

हरभऱ्याचा परभणी चना – १६ (बीडीएनजी २०१८-१६) वाण :  हा वाण विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या बदनापुर येथील कृषि संशोधन केंद्राने विकसित केलेला असुन हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या वाणापासून सरासरी पेक्षा अधिक उत्पादन देणारा वाण असून ११० ते ११५ दिवसात परिपक्व होतो. मर रोगास प्रतिबंधक असून दाणे टपोरे आहेत. १००  दाण्याचे वजन २९  ग्रॅम भरते या वाणावर किडींचा प्रादुर्भाव तुल्यबळ वाणापेक्षा कमी होतो. (Parbhani Chana-16)

 

हरभरा वाण परभणी चना १६ Parbhani Chana-16 परभणी चना-16 हरभरा वाण
Parbhani Chana-16 परभणी चना-16 हरभरा वाण

 

अधिक माहितीसाठी यांचेकडे संपर्क साधावा…

डॉ एस. ए. शिंदे, प्रभारी अधिकारी, बीज प्रक्रिया केंद्र, परभणी (मोबाईल नं.९५११८८४१९७)

डॉ ए. एम. मिसाळ, सहाय्यक पैदासकार, क्यूएसपी युनिट, परभणी (मोबाईल नं.७५८८६१२९४३)

 

 

हे पण पहा :

 

* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?

* रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर

* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर

* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू

* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर

* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!