Posted in

Namo Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी आता 15 हजारांचा सन्मान निधी

Namo Scheme Pm Kisan Yojana नमो योजना निधि वाढ बाबत

Namo Scheme : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 6 हजार रुपये देत असून लवकरच हे देण्यात येणारे अर्थसहाय 3000 रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुर येथील कार्यक्रमात केली आहे.

 

Namo Scheme Pm Kisan Yojana नमो योजना निधि वाढ बाबत

 

देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Scheme) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. तर, त्याच धरतीवर आता महाराष्ट्र शासन देखील राज्यातील शेतकर्‍यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक 6000/- रुपये हे तीन हाफत्यात देत आहे.

 

 

परंतु आता या योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे कारण, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण 12 हजार रुपयांचा निधी आता 15 हजार रुपये करण्यात येणार आहे. (Namo Scheme) 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण’ झाले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम हा मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. Namo Scheme

 

 

 

मुख्यमंत्री श्री. फडणीस म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 6 हजार रुपये वितरीत करते. तर राज्य शासनाच्या वतीने ‘नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे’ शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.  आता राज्य शासन या निधीत 3 हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे 9 हजार आणि केंद्रशासनाचे 6 हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. Namo Scheme

 

 

हे पण पहा :

 

* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 14 फेब्रुवारी 2025 | ट्रॅक्टर, पॉवर टिल्लर, पेरणी यंत्र सर्व

* महाडीबीटी शेतकरी योजना सोडत यादी 14 फेब्रुवारी 2025

* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी आली | 10 फेब्रुवारी 2025 सोडत

* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता

* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार

* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज 

* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?

* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?

* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती