Proof of Identity at Polling Station : मतदानासाठी हे आहेत 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे | विधानसभा निवडणूक 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Proof of Identity at Polling Station : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकी साठी 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने काही मतदार छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक्त इतर एकूण 12 प्रकारचे ओळखपत्र हे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

 

मतदानाच्या दिवशी या 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेली आहे. (Proof of Identity at Polling Station)

 

 

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (Voter Card) आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (Voter Card)  सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त इतर 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. (Proof of Identity at Polling Station)

 

 

12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये खालील प्रमाणे पुरावे ग्राह्य धरले जातील (Proof of Identity at Polling Station)

 

1. आधार कार्ड, 

2. मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, 

3. बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, 

4. कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, 

5. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), 

6. पॅन कार्ड, 

7. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, 

8. पारपत्र (पासपोर्ट), 

9. निवृत्तीवेतनाची दस्तावेज, 

10. केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, 

11. संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, 

12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र

 

हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

 

 

Tags : voter_identity_proof_12_types, vidhansabha_2024, voter_id, proof_of_identity_at_polling_station, 

 

हे पण पहा :

 

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी

* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा

* कृषि विद्यापीठाचे नवीन हरभरा वाण विक्रीस उपलब्ध | परभणी चना-16

* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!