Ration Card eKYC : रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी
Ration Card eKYC : शासनाने रेशनकार्डवरील ई -केवायसी करण्याची अंतीम तारीख ही 31 ऑक्टोबर देण्यात आली होती. दरम्यान आता ई-केवायसी करण्या साठी राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णया मुळे अद्याप ई-केवायसी न केलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तर, आता रेशन कार्ड ई -केवायसी (Ration Card eKYC) करण्याची अंतीम तारीख ही 30 नोव्हेंबरपर्यंत असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पात्र रेशनकार्डवरील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी (Ration Card eKYC) करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, त्याबाबतचे अधिकृत पत्र अद्याप प्राप्त झाले नाही. पुढील ३ दिवसांत म्हणजे सोमवारपर्यंत हे पत्र प्राप्त होईल. दरम्यान राज्यात 30 नोव्हेंबर पर्यंत प्रलंबित लाभार्थ्यांनी नजीकच्या रेशन धान्य दुकानदाराकडे जाऊन त्याच्याकडील ई-पॉस मशिन वर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन पुरवठा विभागा कडून करण्यात आले आहे.
* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार
* रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा
* महाडीबीटी वर किसान ड्रोन साठी अर्ज सुरू | मिळणार एवढे अनुदान?
* नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसरा टप्प्यास दुसर्या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी
* रब्बी मध्ये पण मिळणार नॅनो डीएपी, युरिया, सोलर ट्रप, फवारणी पंप 100% अनुदाना वर
* सोयाबीन, मुग आणि उडदाची हमीभावाने खरेदी सुरू