PVC Pipe Subsidy : महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.5/5 - (2 votes)

 

PVC Pipe Subsidy : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर एका पेक्षा अधिक बाब म्हणजे तुषार संच, ठिबक, रोटावेटर, ट्रॅक्टर, व इतर शेती साधन सामग्री बाबींचा अर्ज करता येतो आणि यामध्ये आपण पोर्टल वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप (PVC Pipe/HDPE Pipe) साठी देखील अर्ज करू शकता आणि यासाठी कृषि विभागाकडून 50% अनुदान देखील दिले जाते.

 

Pvc Pipe Hdpe Pipe Subsidy (1)

 

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि विभागामार्फत पीव्हीसी/एचडीपीइ पाइप (PVC Pipe/HDPE Pipe) साठी अनुदान देय आहे. हे पीव्हीसी/एचडीपीइ पाइप आपण आपल्या शेतातील पाणी इतर ठिकाणी वाहून देण्यासाठी उपयोगी असतात.  तर, जे शेतकरी बांधव हे पीव्हीसी/एचडीपीइ पाइप घेऊ इच्छित आहेत त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज सादर करावा आणि कृषि विभागाकडून देण्यात येणार्‍या अनुदानाचा फायदा घ्यावा.

 

 

पीव्हीसी/एचडीपीइ पाइप अनुदान (PVC Pipe Subsidy)

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी खालील प्रमाणे अनुदान देय आहे.

 

1. लहान सीमान्त शेतकरी/अल्पभूधारक : किंमतीच्या 50% किंवा 35 रु. प्रती मिटर प्रमाणे जास्तीत जास्त रु.15,000/- यापैकी जे कमी असेल ते देय आणि  एचडीपीइ पाइप करिता 50 रु. प्रती मिटर प्रमाणे जास्तीत जास्त रु.15,000/-

 प्रमाणे अनुदान देय आहे.

 

ऑनलाइन सोडत मध्ये निवड झाल्यानंतर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप (PVC Pipe/HDPE Pipe) खरेदी करताना त्या CML नंबर असणे आवश्यक आहे आणि तसेच ज्या विक्रेत्याकडून आपण खरेदी करणार आहात त्यांच्याकडे ते पाइप विकण्यासाठी डीलरशिप प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे.

 

 

पीव्हीसी/एचडीपीइ पाइप ऑनलाइन अर्ज (PVC Pipe application)

 

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे पीव्हीसी/एचडीपीइ पाइप (PVC Pipe/HDPE Pipe) साठी खालील दिलेल्या पद्धतीने महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करा.

 

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती :

 

स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे (mahadbt login)

स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा

स्टेप 3: सिंचन साधने व सुविधा ही बाब निवडावी

स्टेप 4: तपशील मध्ये खालील प्रमाणे पीव्हीसी किंवा एचडीपीइ पाइप निवडावे

 

Pvc Pipe application mahadbt

 

स्टेप 5: पाइप लांबी मीटर मध्ये टाकावी

स्टेप 6: पीव्हीसी पाइप साठी 428 मिटर  किंवा एचडीपीइ पाइप साठी 300 मिटर टाकावी

स्टेप 7: अर्ज जतन करावा

स्टेप 8: मुख्य पृष्ठ वरती यावे

स्टेप 9: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा

स्टेप 10: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा

 

वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर पीव्हीसी किंवा एचडीपीइ पाइप साठी अर्ज सादर करू शकता.

 

अर्ज सादर केल्यानंतर आपला अर्ज हा जिल्ह्याच्या लक्षांक नुसार सोडत साठी विचारात घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला त्याच्या मोबाईल संदेश द्वारे निवड बाबत सूचित करण्यात येईल.

 

 

हे पण पहा :

 

* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार

* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

Tags: mahadbt farmer schemes, mahadbt shetkari yojana, mahadbt pvc pipe anudan, pvc pipe subsidy, mahadbtfarmer,

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!