Single Window Farmer App : शेतकर्यांसाठी एक खिडकी योजना/ फार्मर अॅप तयार करण्यासाठी समिति स्थापन | शासन निर्णय
Single Window Farmer App : शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषि व तदनुषंगिक कामे करीत असताना विविध प्रश्न, समस्यांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना कृषि विषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणे, योजनांचा लाभ तत्परतेने उपलब्ध करुन देणे, कृषि विषयक योजनांचा लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी अर्ज करणे इ. सर्व बाबींकरीता एकाच ठिकाणी सुविधा मिळणे आवश्यक आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित पोर्टल तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. (Single Window Farmer App)
त्यानुसार, शेतकर्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित पोर्टल तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे समितीची स्थापना करण्यात येत असल्याचा शासन निर्णय हा दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे असेल (Single Window Farmer App)
१. शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती प्राप्त करुन घेणे.
२. शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फत विविध योजनांतर्गत देण्यात येणाऱ्या घटकांची अथवा बाबींची अथवा लाभांची माहिती प्राप्त करुन घेणे.
३. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अस्तित्वात असलेली तक्रार निवारण आणि सल्लागार यंत्रणा/प्रणाली यांचा अभ्यास करणे.
४. शेतकऱ्यांना कृषिमध्ये येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी तयार करावयाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची/इंटरफेसची आखणी करणे. Single Window Farmer App
५. सद्य:स्थितीत कृषि विभागांतर्गत अस्तित्त्वात असणाऱ्या विविध संगणकीय प्रणालींचा अभ्यास करणे. (उदा. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प याची संगणकीय प्रणाली, महाअँग्रीडिबीटी प्रणाली, अँग्रीस्टॅक प्रकल्प, इ.)
६. शेतकऱ्यांना पीक पाहणी, हवामान, बाजारभाव इ. बाबींसाठी सध्या उपलब्ध यंत्रणेचा अभ्यास करुन उपरोक्त इंटरफेस मार्फत कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करुन सल्ला देणे.
७. उपरोक्त बाबी व आवश्यकतेनुसार अन्य बाबींचा अभ्यास करुन शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे Farmer App व पोर्टल तयार करणेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे.
तर, उपरोक्त समितीने १५ दिवसांत आपला अहवाल शासनास सादर करावा, असे या शासन निर्णया द्वारे निर्देशित करण्यात आले आहे. (Single Window Farmer App)
* राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबविण्यास मान्यता
* महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार
* महाडीबीटी वर मिळवा टोकन यंत्र साठी रु.10,000/- पर्यंत अनुदान | असा करा अर्ज
* महाडीबीटी वर पीव्हीसी/एचडीपीइ पाइप साठी रु.15000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर बीज प्रक्रिया ड्रम साठी रु.10000/- अनुदान | असा करा अर्ज?
* महाडीबीटी वर तेलघाणा/मिनी ऑइल मिल साठी रु.1,80,000/- अनुदान | असा करा अर्ज?
* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस
* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…
* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?
* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती