Soybean Fertilizers: सोयाबीन खत व्यवस्थापन | सोयाबीन पेरणी करताना “ही” खते वापरा | विद्यापीठ शिफारस नुसार खत व्यवस्थापन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Soybean Fertilizers: महाराष्ट्र मध्ये सोयाबीन या पिकाचा खरीप मध्ये सर्वाधिक जास्त पेरा असतो. आणि आता खरीप हंगाम मध्ये बरेच शेतकरी बांधव हे अधिक उत्पदन मिळवण्यसाठी जास्तीत जास्त उत्पादन देणारे वाण पेरणी साठी निवडत असतात. परंतु, सोयाबीन पिकाचे उत्पादन हे फक्त वाणा वर नसून खत व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन या वरती देखील असते. Soybean Fertilizers

Soybean Fertilizers

 

तर, आपण सोयाबीन पिकासाठी पेरणी करताना कोणती खते द्यायची Soybean Fertilizers आणि किती प्रमाणात द्यायची याबद्दल सविस्तर माहिती याठिकाणी पाहणार आहोत.

 

सोयाबीन पिकासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची शिफारस ही 30:60:30 एनपीके प्रती हेक्टर आहे म्हणजे 30 kg नत्र, 60 kg स्फुरद आणि 30 kg पालाश याप्रमाणे आवश्यक आहे. आणि हेच प्रमाण एकरी 12:24:12 नत्र, स्फुरद, आणि पालाश किलोग्राम प्रती एकर असे आहे.

 

तर, वरील शिफारस नुसार सोयाबीन पिकासाठी खत देण्याचे एकूण नऊ खत संयोजन हे आम्ही येथे आपल्याला उपलब्ध करून देत आहोत त्यापैकि आपण आपल्याकडे उपलब्ध खतांनुसार कोणताही एक संयोजन निवडावा.

 

संयोजन क्र. 01

एन पि के  – 10:26:26  = 46 किग्रा

युरिया – 12 किग्रा

एस एस पी – 75 किग्रा

 

 

संयोजन क्र. 02

एन पि के  – 18:18:10  = 60 किग्रा

एस एस पी – 75 किग्रा

एम ओ पी (पोट्याश) – 20 किग्रा

 

 

संयोजन क्र. 03

एन पि के  – 19:19:19  = 63 किग्रा

एस एस पी – 75 किग्रा

 

 

संयोजन क्र. 04

डीएपी DAP – 18:46:00  = 52 किग्रा

युरिया – 06 किग्रा

एम ओ पी (पोट्याश) – 20 किग्रा

गंधक – 08 किग्रा

 

 

संयोजन क्र. 05

युरिया – 26 किग्रा

एस एस पी – 150 किग्रा

एम ओ पी (पोट्याश) – 20 किग्रा

 

 

संयोजन क्र. 06

एन पि के  – 17:17:17= 71 किग्रा

एम ओ पी (पोट्याश) – 75 किग्रा

 

संयोजन क्र. 07

एन पि के  – 20:20:00 = 60 किग्रा

एस एस पी – 75 किग्रा

एम ओ पी (पोट्याश) – 20 किग्रा

 

संयोजन क्र. 08

एन पि के  – 15:15:15 = 80 किग्रा

एस एस पी – 75 किग्रा

 

संयोजन क्र. 09

एन पि के  – 12:32:16 = 75 किग्रा

युरिया – 07 किग्रा

 

वरील प्रमाणे आपल्याकडे उपलब्ध खतांनुसार संयोजन निवडून दिलेल्या प्रमाणात सोयाबीन पेरणी करेतेवेळेस संपूर्ण खतमात्रा देण्यात यावी. Soybean Fertilizers

 

अधिक वाचा :

* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण

* “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता

* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?

* बियाणे खरेदी करताय..तर मग हे पहा

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!