Individual Farm Pond : महाडीबीटी वैयक्तिक शेततळे | मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे Individual Farm Pond

वैयक्तिक शेततळे (Individual Farm Pond)

महाराष्ट्र राज्यातील 82% शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू होत आहे. राज्याच्या विविध भागातील पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे खंड या प्रमुख नैसर्गिक आपत्ती Individual Farm Pond आहेत. यामुळे सिंचनाअभावी पिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. जेथे पाण्याचा जास्त ताण पडतो तेथील पिके नष्ट देखील होतात. पर्यायाने शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते. जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा ओढे, नाले, नदी इत्यादीद्वारे वाहून जाणारा अतिरिक्त अपधाव उपसून त्याची साठवणूक करण्या करीता शेतावर शोततळ्या सारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देणे हा यावरील एक उपाय आहे.

 

individual farm pond
Individual Farm Pond

 

राज्यात पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारीत जलसंधारणाच्या उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यापूर्वी शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविलेली आहे. त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. शेतक-यांना आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे Individual Farm Pond खोदकामासाठी येणारा खर्च करणे शक्‍य होत नाही.

 

सद्यस्थितीत राज्यातील शेतक-यांना शेततळे Individual Farm Pond खोदकामासाठी शासनाची कोणतीही योजना कार्यान्वित नसल्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक २९ जून, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केलेला आहे.

 

मुख्यमंत्री शाश्वत कृपी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे Individual Farm Pond साठी पात्रता :

 

 

लाभार्थी पात्रता

 

1. अर्जदार शेतकर्‍याकडे स्वत: च्या नावावर किमान ०.६० हेक्‍टर क्षेत्र असणे आवश्‍यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही.

2. अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील. जेणेकरून वाहून जाणारे पावसाचे पाणी नैसर्गिक प्रवाहाद्वारे शेततळ्यात साठविणे करीता पुनर्भरण करणे शक्‍य होईल.

3. अर्जदार शेतक-यांनी यापूर्वी मागेल त्याला होततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा कुठल्याही शासकीय घटकाकरिता खाचराताल बोडो किवा इतर शासकाय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

 

 

लाभार्थी निवड

महा- डीबीटी पोर्टलवर कृषि विभागाने विकसीत केलेल्या प्रणालीद्वारे लाभार्थी निवड करण्यात येईल. त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृपि सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ देण्यांत येईल.

 

 

शेततळयाच्या जागा निवडीचे तांत्रिक निकष

 

  1. ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे, अशी जमिन असलेल्या जागेची निवड करावी. काळी जमिन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने निवड करण्यात यावी.
  2. मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक अशी जमिन असलेली जागा शेततळ्यास निवडू नये.
  3. जलपरिपुर्ण झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळी प्राधान्याने घेण्यात यावीत.
  4. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण ३ टक्क्याचे आत आहे, त्या ठिकाणी शेततळी घेण्यात यावीत.
  5. नाल्याच्या /ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येवू नये.
  6. इनलेट/ आऊटलेटसह शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी (अपधाव) हे शेततळ्याच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील.
  7. इनलेट / आऊटलेट विरहीत शेततळ्यासाठी पुनर्भरणाकरीता अतिरिक्‍त अपधाव उपलब्ध असल्याची खातरजमा करण्यात यावी.
  8. सभोवतालच्या जमिनीत दलदल व चिबड होईल तसेच शेततळ्यातून पाणी पाझरून लगतच्या शेतक-याच्या स्थावर/जंगम मालमत्तेचे नुकसान होईल अशा जमिनी शेततळ्यासाठी निवडण्यात येवू नयेत.
  9. शेततळ्याला लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुशीने व विनामुल्य द्यावयाची आहे.

 

शेततळ्यासाठी आकारमान निहाय अनुज्ञेय अनुदान

 

मुख्यमंत्री शाश्वत कृपी सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रक्कम रुपये ७५०००/- (अक्षरी रक्‍कम रूपये, पंच्याहत्तर हजार) रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. शेततळ्याच्या विविध आकारमान नुसार खालील प्रमाणे अनुदान देय असेल.

farm pond 1

 

 

farm pond 2

 

 

शेततळे ऑनलाइन अर्ज

 

महाडीबीटी पोर्टल वर शेततळे बाबी साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्यावी

महाडीबीटी वर शेततळे साठी या पद्धतीने अर्ज करा : अर्ज करा

 

 

ऑनलाइन अर्ज मध्ये निवड झाल्यानंतर पोर्टल वर आपलोड करावयाची कागदपत्रे

 

महाडीबीटी पोर्टल वर निवड झाल्यानंतर लाभार्थी शेतकरी यांनी खालील कागदपत्रे पोर्टल वर आपलोड करावीत

 

1. 7/12 उतारा

2. होल्डिंग

3. वैयक्तिक शेततळे हमीपत्र : डाऊनलोड करा

 

 

कृषि विभाग अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक प्रपत्र

 

स्थळ पाहणी अहवाल प्रपत्र : डाऊनलोड करा

 

अर्ज छाननी अहवाल : डाऊनलोड करा

 

मोका तपासणी अहवाल प्रपत्र : डाऊनलोड करा

 

मुख्यमंत्री शाश्वत कृपी सिंचन योजना – वैयक्तिक शेततळे : शासन निर्णय

 

मुख्यमंत्री शाश्वत कृपी सिंचन योजना – वैयक्तिक शेततळे : मार्गदर्शक सूचना

 

 

अधिक वाचा :

* परभणी जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

* महाडीबीटी बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का?

* “या” तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

error: Content is protected !!