कृषि विभाग भरती जाहिरात 2023 | Krushi Vibhag Stenographer Bharti 2023 | Stenographer Recruitment Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

कृषि विभाग जाहिरात

कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट –क संवर्गातील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) Krushi Vibhag Stenographer Bharti 2023  या राज्यस्तरीय संवर्गातील रिक्‍त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात सन – २०२३.

Krushi Vibhag Stenographer Bharti 2023
Krushi Vibhag Stenographer Bharti 2023

 

पदभरती हि राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्‍तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट -क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या Krushi Vibhag Stenographer Bharti 2023 संवर्गातील रिक्‍त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल,२०२३ पासून दिनांक २० एप्रिल,२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन- क्र.मकसी-१००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.

 

 

 

शैक्षणिक अर्हता व अनुभव:

 

पदाचे नाव/शैक्षणिक अर्हता व अनुभव Krushi Vibhag Stenographer Bharti 2023

१. लघुटंकलेखक : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

२. लघुलेखक (निम्न श्रेणी) :  माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

३. लघुलेखक (उच्च श्रेणी) : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

 

 

 

 

रिक्त पदांचा तपशील :

Krushi Vibhag Stenographer Bharti 2023 लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

 

 

लघुटंकलेखक :

steno 11

 

 

 

लघुलेखक (निम्न श्रेणी) :

steno 1

 

 

लघुलेखक (उच्च श्रेणी) :

steno 2

 

 

 

वेतनश्रेणी :

Krushi Vibhag Stenographer Bharti 2023 लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या पदांची वेतनश्रेणी ही खालील प्रमाणे आहे.

 

steno pay scale

 

 

 

 

निवडप्रक्रिया :

जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रते विषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. Krushi Vibhag Stenographer Bharti 2023

सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच तरतुदीनुसार राबविण्यात येईल : (१) सामान्य प्रशासन विभाग, लघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी/निम्न श्रेणी) ( सेवा प्रवेश नियम ), १९९७ Krushi Vibhag Stenographer Bharti 2023

 

 

 

 

निवडीची पद्धत :

सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. सदर परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल.

संगणक आधारीत परीक्षेव्दारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण व व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त गुण अशा एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्‍यक राहील. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक व वेळापत्रक कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

संगणक आधारीत घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा ६० प्रश्नांची व १२० गुणांची असेल. त्यासाठी ७५ मिनिटांचा कालावधी राहील.

 

 

 

 

परीक्षा अभ्यासक्रम :

संगणक आधारीत ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील:

 

steno syllabus

 

 

परीक्षा शुल्क:

अमागास – ७२०/-रू

मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – ६५०/- रू

उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्‍त असतील.

परीक्षा शुल्क ना -परतावा आहे.

 

 

 

 

अर्ज करण्याची पध्दत :

प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.

पात्र उमेदवाराला वेब आधारीत ऑनलाईन अर्ज www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक ६ एप्रिल,२०२३ पासून दिनांक २० एप्रिल,२०२३ या कालावधीत सादर करणे आवश्‍यक राहील. Krushi Vibhag Stenographer Bharti 2023

 

विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी’उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना:

 

उपरोक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक ६ एप्रिल,२०२३ पासून दिनांक २० एप्रिल,२०२३ या कालावधीमध्ये वेब बेस्ड ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्‍यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक ६ एप्रिल,२०२३ पासून दिनांक २० एप्रिल,२०२३ या कालावधीमध्ये करता येईल.

विहित पद्धतीने मुदतीत म्हणजेच दिनांक २० एप्रिल,२०२३ पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रक्‍कम भरण्याची कार्यवाही दिनांक ६ एप्रिल,२०२३ रोजी सकाळी ७.०० वा. पासून दिनांक २० एप्रिल,२०२३ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर सदर वेब लिक बंद होईल. Krushi Vibhag Stenographer Bharti 2023

 

परीक्षा स्थगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास राहतील व विभागाचा निर्णय अंतिम असेल, त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वा तक्रारी बाबत निर्णय घेण्याचा अधिकार विभागास राहील व विभागाचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणत्याही पत्र व्यवहाराची दाखल घेतली जाणार नाही.

 

उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्‍यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा.

 

उमेदवारांची परीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पुर्व तपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. उमेदवाराना ऑनलाईन परीक्षेतील मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे सर्व अधिकार आयुक्‍त (कृषी) राखून ठेवीत आहेत.

 

 

कृषि विभाग भरती जाहिरात 2023 : सविस्तर पहा/डाऊनलोड करा

 

अधिक वाचा :

* पॅन आधार लिंक केले का? केले नसेल तर मग येथे पहा

* नवीन कृषि यंत्रे पूर्व संमती यादी महाडीबीटी योजना

* स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

* कांदा अनुदान योजना शासन निर्णय पहा

* कृषी यंत्रे सोडत यादी 25 मार्च 2023

 

error: Content is protected !!