Crop Insurance : रब्बी हंगामातील पिकांसाठी देखील एक रुपयात पीक विमा योजना | हरभरा, ज्वारी, गहू, 1 रुपयात पीक विमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Crop Insurance : सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1  भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

 

crop insurance rabi season 2023-24

 

सदर योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरीता  शेतक-यांना केवळ रु.1 भरुन पीक विमा Crop Insurance योजनेचा लाभ घेण्यास मान्यता देण्यात आली होती.

 

 

कृषि मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी कृषि आयुक्तालय पुणे येथे रब्बी हंगाम आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी, खरीप हंगामाप्रमाणे राज्यात रब्बी हंगामातही 1 रुपयात पीक विमा Crop Insurance योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली. रब्बी पीक विमा योजना मध्ये ज्वारी, गहू, मका, हरभरा, रब्बी कांदा या पिकांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

 

तसेच, राज्यामध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असलेल्या महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या म्हणजेच 25% अग्रीम रक्कम देण्याचे आदेश हे विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत आणि तशा अधिसूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या आहेत. परंतु, त्यावर विमा कंपनी Crop Insurance यांनी आक्षेप नोंदविले होते पण हे सर्व आक्षेप हे कृषि आयुक्त यांनी फेटाळून लावले आहेत आणि दिवाळी पूर्वी शेतकर्‍यांना पीक विमा निकषा नुसार 25% अग्रिम रक्कम मिळेल आणि त्यासाठी शासन प्रयत्नशील असेल असे कृषि मंत्री यांनी संगितले आहे.  

 

रब्बी हंगाम पीक विमा समाविष्ट पिके Crop Insurance

रब्बी पीक विमा योजना मध्ये ज्वारी, गहू, मका, हरभरा, रब्बी कांदा या पिकांचा समावेश असेल.

 

 

अधिक वाचा :

* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??

* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू

* नमो चा पहिला आणि पीएम किसान चा 15 हफ्ता सोबतच मिळणार का??

* आता मिळणार वार्षिक 8000/- रुपये

* खतांसाठी 100% अनुदान शासन निर्णय आला…

* शेतकर्‍यांनो लवकर “हे” काम करा अन्यथा रु.12000/- कायमचे विसरा

error: Content is protected !!