MahaDBT Seed : महाडीबीटी अनुदानित बियाणे सोडत निघाली…तुम्हाला असा मेसेज आला का? | हरभरा, ज्वारी, गहू, करडई बियाणे | mahadbt seed lottery
MahaDBT Seed : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे रब्बी हंगाम 2023 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर रब्बी पिकांचे बियाणे वितरण साठी अर्ज मागविण्यात आले होते आणि त्या अरजांची ऑनलाइन सोडत ही दिनांक 25 ऑक्टोबर रोजी काढण्यात आली आहे.
महाडीबीटी पोर्टल वर दिनांक 1 ऑक्टोबर पासून ऑनलाइन पद्धतीने बियाणे घटकासाठी MahaDBT Seed अर्ज स्वीकारणे सुरू होते आणि याची शेवटची तारीख ही दिनांक 20 ऑक्टोबर ही होती. तर, आज दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे बियाणे घटकाची सोडत काढण्यात आली आहे. यामध्ये शेतकर्यांची प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिक बियाणे वितरण या बाबी साठी निवड करण्यात आली आहे.
ऑनलाइन सोडत मध्ये ज्या शेतकर्यांची निवड झाली आहे त्यांना खालील प्रमाणे संदेश पाठविण्यात आले आहेत. MahaDBT Seed
तर, निवड झालेल्या शेतकर्यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषि विभागाशी किंवा कृषि सहाय्यकांशी संपर्क करून बियाणे परमीट घ्यावे आणि त्यानंतर बियाणे परमीट द्वारे तालुक्यातील कृषि सेवा केंद्र वरुण अनुदानित बियाणे उचल करावी.
अधिक वाचा :
* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा
* महाडीबीटी लाभार्थी निवड यादी 20 ऑक्टोबर 2023
* “या” दिवशी मिळणार राज्यातील शेतकरी कुटुंबांना लाभ
* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??
* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू