Rabi Crop Insurance : रब्बी पीक विमा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे | पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1  भरुन पीक विमा योजनेचा Rabi Crop Insurance लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 

 

Rabi Crop Insurance

 

सदर योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरीता  Rabi Crop Insurance शेतक-यांना केवळ रु.1 भरुन पीक विमा योजनेचा लाभ घेण्यास मान्यता देण्यात आली होती.

 

रब्बी हंगाम पीक विमा 2023-24 Rabi Crop Insurance

 

कृषि मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी कृषि आयुक्तालय पुणे येथे रब्बी हंगाम आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी, खरीप हंगामाप्रमाणे राज्यात रब्बी हंगामातही 1 रुपयात पीक विमा योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली. रब्बी पीक विमा योजना मध्ये रब्बी हंगामातील पीके ज्वारी, गहू, मका, हरभरा, रब्बी कांदा या पिकांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

या तारखेपासून अर्ज सुरू

दिनांक 01 नोवेंबर पासून रब्बी हंगामातील पिकांसाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहेत.

 

 

आवश्यक कागदपत्रे

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :

  1. सात बारा उतारा आणि होल्डिंग
  2. आधार
  3. बँक खाते पासबूक
  4. पीक पेरा स्वयंघोषणा पत्र

 

पीक विमा अर्ज कोठे करावा?

रब्बी पीक विमा अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र वरती भेट द्यावी.

 

रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा 

 

 

अधिक वाचा :

* महाडीबीटी 01 नोव्हंबर सोडत यादी पहा

* “या” तीन जिल्ह्यांचा अग्रीम भरपाईचा मार्ग मोकळा

* महाडीबीटी लाभार्थी निवड यादी 20 ऑक्टोबर 2023

* “या” दिवशी मिळणार राज्यातील शेतकरी कुटुंबांना लाभ

* निधि अभावी कृषि यांत्रिकीकरनाची सोडत बंद??

* नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अनुदान वितरण सुरू

error: Content is protected !!