Digital Crop Survey : ई-पीक पाहणीची सुविधा खरिपापासून रद्द तर आता नवीन डिजिटल क्रॉप सर्व्हे पद्धत | पीक पाहणी मध्ये होणार बदल
Digital Crop Survey : राज्य शासनाने ई पीक पाहणी (e peek pahani) ही पिकांची नोंद सात बारा उतारावरती करणे सोयिस्कर व्हावे या साठी सुरू करण्यात आली होती. परंतु, या मध्ये प्रत्यक्ष शेतात न जाता देखील पिकांची नोंद करता येत होती परंतु आता शेतात न जाताच शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई-पीकपाहणी करण्याची सुविधा ही पुढील खरिपा पासून म्हणजेच 2024 खरीप हंगाम पासून काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे पुढे प्रत्यक्ष शेतात/गटा मध्ये 50 मीटरपर्यंत गेल्याशिवाय पीक पाहणीची नोंद करता येणार नाही, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेली आहे. Digital Crop Survey
ई पीक पाहणी अॅप्लिकेशन द्वारे शेतात न जाता शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई-पीकपाहणी करण्याची सुविधा ही पुढील खरिपा पासून काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात 50 मीटरपर्यंत गेल्याशिवाय अॅप्लिकेशन द्वारे पीकपाहणीची नोंद होणार नाहीये. तसेच, ही ई पीक पाहणी पद्धत ही केंद्राने बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार केंद्राने स्वतःची डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस Digital Crop Survey ) पद्धत पुढील खरिपापासून लागू केली आहे.
परंतु, केंद्राने दिलेले उपयोजन (अॅप्लिकेशन) Digital Crop Survey हे राज्याने स्वीकारलेले नाही तर त्याऐवजी राज्याने आधीच्या ई-पीक पाहणी अॅप मध्येच काही बदल करण्याचे ठरवले आहे.
ई-पीक पाहणीच्या कामात होणारे बदल
1. मोबाइल द्वारे कोणत्याही ठिकाणाहून पीक पाहणी करण्याची पद्धत कायमची रद्द होणार
2. गावातील गटात आणि गटातील शेतात प्रत्यक्ष गेल्या शिवाय ई-पीक पाहणी करता येणार नाही
3. प्रत्यक्ष शेतात ५० मीटरच्या आत गेल्यानंतरच पिकाचे छायाचित्र हे अपलोड होईल
4. तलाठी स्तरावर होणाऱ्या ई-पीक पाहणीत छायाचित्र काढले जात नव्हते तर आता ते काढावे लागणार.
5. ई-पीक पाहणीची कामे तलाठ्या ऐवजी आता खासगी सहायक हे करतील आणि प्रत्येक गावाला एक सहाय्यक देण्यात येणार.
6. सहाय्यकला तलाठ्याच्या अखत्यारित कामे करावी लागतील आणि त्यांना केवळ मानधन दिले जाईल.
अधिक वाचा :
* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा
* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा
* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा
* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा
* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज सुरू… येथे करा अर्ज
* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान
* सावधान… कुसुम सोलर पंप योजना मध्ये होऊ शकते फसवणूक
* महिला बचत गटांना मिळणार 8 लाख रुपये अनुदान
* या जिल्ह्याची सोलर पंप यादी आली…पहा स्टेटस
* या जिल्ह्यात फळपीक विमा मिळण्यास सुरुवात