PM Kisan Fraud App : शेतकर्‍यांनो सावध रहा | फसव्या पीएम किसान अ‍ॅप्लिकेशन पासून सावध रहा अन्यथा तुमचे पण बँक खाते होणार रिकामे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.2/5 - (4 votes)

PM Kisan Fraud App : शेतकरी बांधवानो व्हॉट्सॲप च्या माध्यमातून फसव्या पीएम किसान ॲप लिंक पासून सावध रहा अन्यथा तुमचे पण बँक खाते होणार रिकामे होऊ शकते.

 

PM Kisan Fraud App 10
PM Kisan Fraud App 10

 

 

pmkisan

 

नुकतेच राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आला आहे. परंतु काहि शेतकर्‍यांना हा हफ्ता मिळाला नसून त्याची वितरण प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आपल्या ला हफ्ता मिळाला की नाही हे पाहण्यासाठी काही सायबर भामटे हे शेतकर्‍यांना फ्रौड पीएम किसान ॲप ची लिंक पाठवून ते मोबाइल मध्ये इंस्टॉल करण्यास सांगतात आणि त्याद्वारे ते बँक तपशील, otp सर्व संदेश त्यांच्याकडे घेतात. आणि त्याद्वारे ते संबधित शेतकर्‍याच्या बँक खात्यामधून पैसे काढून घेतात. (PM Kisan Fraud App)

 

 

याच दरम्यान, राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांची अशा प्रकारे मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलेले आहे. झाले असे की, व्हॉट्सॲप त्यांना पीएम किसान ॲप लिंक पाठविण्यात आली आणि त्यांच्या खात्यातून एकूण 7 लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत. (PM Kisan Fraud App)

 

 

त्यामुळं आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही सावध करणारी बातमी आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावमध्ये शेतकर्‍यांना मोबाईलवर पीएम किसान ॲप ची बनावट लिंक पाठवून सायबर भामट्यांनी 5 शेतकऱ्यांच्या खात्यातील 7 लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे.

 

 

तर या शेतकर्‍यांना बँकेत असलेल्या खात्यामधून अचानक पैसे डेबिट होत असल्याचे संदेश आल्यानं शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली, त्यानंतर शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या पोलीस मुख्यालयातील सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

 

 

तर, सर्व शेतकरी बांधवांनी व्हॉट्सॲप वर पाठविण्यात आलेल्या अशा लिंक किंवा ॲप वर क्लिक करू नये आणि तसेच व्हॉट्सॲप वर पाठविण्यात आलेले कोणतेही अण्ड्रोइड ॲप मोबाइल वर इंस्टॉल करू नये. (pm kisan status check 2024)

 

 

सर्वांना विनंती आहे की PM Kisan list.Apk, Gharkul yojana.Apk, CSC CENTER.APK, SBI Rewards.APK, MGB Rewards.APK, Solar Pump list.Apk इत्यादी कुठलीही APK (android app) फाईल डाऊनलोड करून install किंवा उघडू नये म्हणजे ह्या PDF किंवा डॉक्युमेन्ट फाईल नसतात. तर ही APK फाईल डाऊनलोड किंवा इंस्टॉल केल्यावर लगेच आपला मोबाईल चे नियंत्रण जाते म्हणजे मोबाईल हॅक होतो, तसेच हॅक करणारी व्यक्ती त्या मोबाईल वरून ग्रुप वर ही APK फाईल सर्व ग्रुप वर पाठवते. व त्या मोबाईल वरील फोनेपे, गुगल पे, पे टीम, अमेझॉन सारखे ॲप हॅक करून धडाधड 7 ते 8 OTP येतात व बँक खाते रिकामे होते. तसेच बँकेतून पैसे कमी झालेले SMS येतात ते सुद्धा हॅकर माणसे डिलीट करून टाकतात त्यामुळे आपल्याला समजत नाही.

 

उपाय – ही ॲप इंस्टॉल करून मोबाईल हॅक झाले असता लगेच शक्य झाल्यास जमल्यास इंटरनेट बंद करून, इंस्टॉल झालेले ही ॲप लगेच uninstall करणे किंवा डिलीट करणे. तरी सर्वांनी अश्या फ्रोड ला बळी पडू नये.

 

सर्व शेतकरी बांधवांनी याबाबत ची काळजी घ्यावी.

 

खालील प्रमाणे अण्ड्रोइड ॲप मोबाइल वर पाठविले जाते तर असे कोणतेही अण्ड्रोइड ॲप मोबाइल वर इंस्टॉल करू नका. 

 

PM Kisan Fraud App
PM Kisan Fraud App

 

 

pm kisan fraud

 

 

PM Kisan Fraud App

 

 

pm kisan status check 2024

 

 

PM Kisan Fraud App 5

 

Pm Kisan Fraud Alert

 

 

हे पण पहा :

 

* दि. 5 ऑक्टोबर ला “या” शेतकर्‍यांना मिळणार रु. 4000

* शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 997 कोटी रुपये मंजूर

* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?

* अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

 

Tags : pmkisan, pmkisan_fraud_alert, apk_file_fraud, namo_shetkari_yojana, pm_kisan_scheme_application_fraud,

error: Content is protected !!