Posted in

Farm Equipment Purchase Conditions : कृषि यंत्र/औजारे साठी ची “ही” अट रद्द?

Farm equipment purchase conditions
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.5/5 - (2 votes)

 

Farm Equipment Purchase Conditions : कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्‍यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते.

 

परंतु, निवड झालेल्या शेतकर्‍यांना पूर्व संमती मिळाल्या नंतर 30 दिवसांत देयक/बिल आपलोड करणे बंधनकारक असते आणि तशी सूचना ही संमती पत्रावर देखील देण्यात येते. परंतु, शेतकऱ्यांना यंत्रे व अवजारे खरेदी करण्यास राज्यभर विलंब होतो आहे त्यामुळे पूर्वसंमतिपत्रे प्रदान केल्यानंतर 30 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना खरेदीची देयके अपलोड करण्यात अडचणी येत असल्यामुळे, देयके सादर करण्यासाठी संचालनालयाने यापूर्वी निश्चित केलेली अट सद्यःस्थितीत विचारात घेऊ नका, असे सर्व विभागीय कृषी सहसंचालकांनाही कळविले आहे. (Farm Equipment Purchase Conditions)

 

तर, यंत्रे व अवजारे खरेदीनंतर शेतकऱ्यांनी मुदतीत बिले अपलोड करण्याची अट आता राज्याच्या कृषी अभियांत्रिकी संचालनालयाने तूर्त शिथिल केली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अभियांत्रिकी विभागाचे संचालक अंकुश माने यांनी राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना यापूर्वीच लेखी आदेशदेखील जारी केले आहेत.

 

कृषी यांत्रिकीकरण योजनेतून चालविले जाणारे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील ‘डीपीआर बेस्ड’ कृषी यांत्रिकीकरण अशा तीनही योजनांमधून निवड झालेल्या शेतकऱ्यांकरिता दिलासा मिळाला आहे. (Farm Equipment Purchase Conditions)

 

बिल अपलोड मुदत शिथिल

 

error: Content is protected !!