Posted in

MahaDBT Farmer Portal : बिल अपलोड केले नाही…. पूर्व संमत्या रद्द झाल्या? | आता काय करावे?

Mahadbt farmer portal presanction
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

MahaDBT Farmer Portal : कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्‍यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने, फळबाग लागवड अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज मागविले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते.

 

निवड झाल्यानंतर शेतकरी यांनी त्यांच्या डेस्क वरुण आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यांची छाननी करून त्या अर्जास पूर्व संमती दिल्या जाते आणि ही संमती मिळाल्या नंतर संबधित शेतकरी हे निवड झालेले यंत्र/औजारे/घटक खरेदी करून देयके/बिल अपलोड करतात. (MahaDBT Farmer Portal)

 

शेतकरी यांनी बिल अपलोड केल्यानंतर अधिकारी त्या घटकाची जाय मोक्यावर जाऊन तपासणी करून अनुदान वितरण करण्याची शिफारस करत असतात. परंतु, चालू आर्थिक वर्षा मध्ये कृषि विभागाने काढलेल्या सोडत मधून बरेच शेतकरी यांना पूर्व संमती मिळून 2 – 3 महीने झाले होते परंतु त्यांनी अद्याप यंत्र/औजारे/निवड घटक खरेदी करून बिल/देयके अपलोड केलेली नाहीत. तर, शा शेतकर्‍यांना आता कृषि विभागा मार्फत त्यांच्या मोबाइल वरती संदेश पाठवून हे बिल/देयके अपलोड करण्यासाठी 5 दिवसांची मुदत देण्यात आली होती परंतु त्यानंतर देखील ज्या शेतकर्‍यांनी बिल अपलोड केलेले नाही अशा पूर्व संमत्या पोर्टल द्वारे रद्द करण्यात आलेल्या आहेत. (MahaDBT Farmer Portal)

 

तरी, ज्या लाभार्थी शेतकरी यांना पूर्व संमती आली होती परंतु बिल वेळेत अपलोड करू शकले नाही त्यांनी आता निवड झालेला घटक घेण्यापूर्वी आपली संमती आहे किंवा रद्द झाली हे तपासून घ्यावे आणि नंतरच घटक खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. कारण, दिलेल्या मुदतीत ज्यांनी बिल अपलोड केलेले नाही असे सर्व अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत.  (MahaDBT Farmer Portal)

 

तर, आज रोजी राज्य कृषि यांत्रिकीकरण योजना अंतर्गत 1,75,629 पूर्व संमत्या रद्द करण्यात आले आहेत. तसेच, कृषि यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत 15,810 आणि प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत 62,121 पूर्व संमत्या ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तरी, ज्यांना पूर्व संमती आली होती त्यांनी आता घटक खरेदी करण्यापूर्वि आपली संमती आहे किंवा रद्द झाली हे तालुका कृषि कार्यालय येथे संपर्क करूनच पुढील खरेदी चा निर्णय घ्यावा.  आणि वेळेत बिल अपलोड न केल्यामुळे ज्या पूर्व संमत्या रद्द झाल्या आहेत त्यांना आता कोणताही पर्याय उपलब्ध नाही तर, अशा शेतकर्‍यांनी आता केवळ नवीन अर्ज करणे हा एकमेव पर्याय आहे. 

 

 

हे पण पहा :

* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी 

* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?

* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?

* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार

* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी

* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार

* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता 

* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार

* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

error: Content is protected !!