Kapus Bhavantar Yojana : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव पडलेल्या काळात दिलासा देण्यासाठी सीसीआयच्या माध्यमातून सरकार हमीभावाने कापूस खरेदी करते. पण मागील दोन हंगामांत सीसीआयवर कापूस खरेदीचा ताण आला होता. सीसीआयला दोन्ही हंगामांत १०० लाख गाठींपेक्षा अधिक कापूस खरेदी करावा लागला.
एवढे होऊनही हमीभाव खरेदीचा सर्वच शेतकऱ्यांना फायदा मिळाला नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ कसा मिळेल आणि खरेदीऐवजी दुसरा कार्यक्षम पर्याय कोणता हे शोधण्यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत भावांतर योजना राबविण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. (Kapus Bhavantar Yojana)
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआय आता किमान आधारभूत किमतीने (हमीभाव) कापूस खरेदी करण्याऐवजी भावांतर योजना राबविण्याचा विचार करत आहे. ‘भावांतर’ची फलनिश्चिती तपासण्यासाठी २०२६-२७ च्या हंगामात आंध्र प्रदेश आणि तेलंगणात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे. (Kapus Bhavantar Yojana)
सीसीआय २०२६-२७ हंगामात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत प्रयोगिक तत्त्वावर भावांतर योजना राबविणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम आशा कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस खरेदीचे पैसे डीबीटीमार्फत जमा होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये आपल्या गरजेनुसार कापूस विकता येईल. (Kapus Bhavantar Yojana)
कशी असेल भावांतर योजना?
शेतकऱ्यांनी बाजारात कापूस विकल्यानंतर मिळालेला भाव आणि हमीभाव यातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे. उदा. यंदा कापसाला हमीभाव ८११० रुपये आहे. पण बहुतांशी शेतकऱ्यांना बाजारात ७ हजाराच भाव मिळाला तर या भावांतर योजनेतून या शेतकऱ्यांना १११० रुपये भाव फरक मिळाला असता. तर, अशी ही कापूस भावांतर योजना ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत प्रयोगिक तत्त्वावर चालू वर्षी रबिवण्यात येणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण राज्यांमध्ये लागू केली जाऊ शकते. (Kapus Bhavantar Yojana)
* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी
* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?
* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?
* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार
* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?


