Posted in

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील 5 दिवस पावसाची उघडीप ?

Maharashtra Weather Alert
5/5 - (1 vote)

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरल्याने मागील दोन दिवसांपासून प्रामुख्याने उघडीप पाहायला मिळत आहे. तसेच उन्हाचा चटका वाढला असून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. तर ऊन सावल्यांचा खेळही अनुभवायला मिळत आहे. आज राज्यात पावसाची उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बहुतांश भागात अजूनही दमदार पावसाची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत.

 

हवामानशास्त्र विभागाने पुढील 5 दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे.  रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज आहे.

 

रविवारीही राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असून सोमवारी पूर्व विदर्भात विजा आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. Maharashtra Weather Alert

 

मंगळवारी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज असून बुधवारीही विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाच्या उघडीपीचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. Maharashtra Weather Alert

 

error: Content is protected !!