Farm Loan Waiver : शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६ च्या निकषात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज दिनांक 14 जुलै रोजी मंजुरी दिली आहे. Farm Loan Waiver
यामुळे २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची ५० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द होऊन त्यांना नियमित कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच सन २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. Farm Loan Waiver
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 14 जुलै रोजी झालेल्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत नुकतीच याबाबत घोषणा केली होती.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली. यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तसेच २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अटही रद्द केली आहे. यामुळे नवीन कर्ज घेऊन वेळेत परतफेड करण्याची अट आता लागू होणार नाही. Farm Loan Waiver
