Karjamafi ekyc : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम सुरु झाले आहे. सहकार विभागाने १७ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यांना १३000 कोटी रुपये देत आहोत. आता दुसऱ्या यादीचे काम सुरु आहे. पहिल्या यादीतील जे शेतकरी आहेत त्यांच्या गावांमध्ये कर्जमाफीच्या याद्या जात आहेत. त्याची तत्काळ पडताळणी करुन ३१ तारखेपूर्वीच १७ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. Karjamafi ekyc
या योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. सदर गावनिहाय याद्या विकास सेवा सोसायटीचे सचिव, ग्रामसेवक व तलाठ्यांच्या मदतीने उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. आता शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण प्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये शेतकऱ्यांच्या याद्या उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे. Karjamafi ekyc
कर्जमाफी योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकऱ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक VK नंबर देण्यात येणार आहे. आधार क्रमांक अथवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करावे लागेल. राज्यातील सुमारे ३२ हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. Karjamafi ekyc
ई केवायसी साठी लागणारी माहिती?
ई केवायसी करण्यासाठी आधार कार्ड, कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक, यादीत तुमच्या नावापुढे नमूद केलेला विशिष्ट क्रमांक घेऊन जावे लागेल. त्यासाठी ग्रामपंचायत अथवा बँकेत जाऊन यादी पाहावी. त्यावर तुमचे नाव आणि युनिक क्रमांक मिळाल्यावर पुढील प्रक्रिया सुरु करता येईल. Karjamafi ekyc
कुठे करता येणार ई केवायसी?
कर्जमुक्ती योजनेच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र अथवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, असे सांगण्यात आले आहे. Karjamafi ekyc
यादी कोठे पहावी ?
कर्जमाफी याद्या ह्या आपण आपल्या कर्ज असलेल्या बँकेत पाहू शकता, किंवा पुढील आठवड्यात आपल्या गावा मध्ये ग्रामपंचायत स्तरावर देखील ह्या याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.








