Posted in

e-Peek Pahani Sahayak : ई-पीक पाहणी सहाय्यक म्हणून नोंदणी कशी करायची? पीक पाहणी सहाय्यक यांना मिळणार मानधन? 

E Peek Pahani Sahayak
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

e-Peek Pahani Sahayak : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत DCS प्रणालीअंतर्गत ‘ई-पीक पाहणी सहाय्यक’ (e-Peek Pahani Sahayak) ही नवीन व्यवस्था राबवण्यात येत आहे.

 

जे शेतकरी वृद्ध आहेत, ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही किंवा ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे स्वतःच्या मोबाईलवरून पिकांची नोंदणी करणे शक्य होत नाही. तसेच स्मार्टफोन असून देखील काही शेतकऱ्यांना पिकांची नोंद कशी करावी याची योग्य माहिती नाही अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावात एक ‘ई-पीक पाहणी सहाय्यक’ नियुक्त करण्याचे ठरविले आहे. e-Peek Pahani Sahayak

 

ई-पीक पाहणी सहाय्यकाची कर्तव्य 

 

शेतकऱ्यांना मदत करणे: गावात ज्या शेतकऱ्यांना ॲप चालवता येत नाही,जे शेतकरी वृद्ध आहेत तसेच ज्या शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या पिकांची अचूक माहिती व फोटो ॲपमध्ये अपलोड करणे.

DCS MH प्रणालीचा वापर: DCS च्या नवीन मानकांनुसार (उदा. Geo-Fencing आणि GPS Location) पिकाची अचूक नोंदणी करणे.

वेळेत नोंदणी पूर्ण करणे: खरीप व रब्बी हंगामात गावातील १००% क्षेत्राची पीक पाहणी वेळेत पूर्ण होण्यासाठी तलाठी आणि ग्रामस्तरावरील प्रशासनाला सहकार्य करणे.

शेतात प्रत्यक्ष भेट: सहाय्यक शेतात स्वतः जाऊन पिकांचे अक्षांश-रेखांश (GPS Coordinates) आणि थेट फोटो DCS MH ॲपमध्ये अपलोड करतो.

अचूक डेटा एंट्री: पिकाचा प्रकार (सलग पीक, मिश्र पीक, बहुपीक), पेरणी/लागवडीचे क्षेत्र आणि सिंचनाचे साधन (विहीर, कूपनलिका, कालवा इ.) यांची नोंद करतो.

शेतकऱ्यांना पावती देणे: नोंदणी पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याला त्याची डिजिटल नोंद झाल्याची खात्री करून देतो. e-Peek Pahani Sahayak

 

 

सहाय्यकांसाठी दिले जाणारे मानधन

 

शासनामार्फत ई-पीक पाहणी सहाय्यकांना त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे मानधन दिले जाते.

दर प्रति खाते/गट: प्रत्येक अचूक नोंदणीकृत गटासाठी/पिकासाठी शासनाने ठराविक रक्कम ठरवून दिली आहे.

DBT द्वारे जमा: हे मानधन थेट सहाय्यकाच्या बँक खात्यात शासनाकडून जमा केले जाते. e-Peek Pahani Sahayak

डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत सहायकांना ओनर्स प्लॉट निहाय हंगाम निहाय प्रति ओनर्स प्लॉट अनुज्ञेय असणा-या मानधनामध्ये सुधारणा करुन एकल पिकासाठी रु.१०/- प्रति प्लॉट आणि मिश्र पिकांसाठी रु. १२/- प्रति प्लॉट मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

 

ई-पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत सहाय्यक होण्यासाठी आवश्यक पात्रता

 

गावात ई-पीक पाहणी सहाय्यक/सर्व्हेअर म्हणून काम करण्यासाठी खालील अटी आवश्यक असतात:

शिक्षण: किमान १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण (कृषी शाखेची पार्श्वभूमी असणाऱ्यांना प्राधान्य).

साहित्य: स्वतःचा अँड्रॉइड स्मार्टफोन (चांगला कॅमेरा आणि GPS सुविधा असलेला).

स्थानिक रहिवाशी: संबंधित गावातील किंवा महसूल मंडळातील स्थानिक नागरिक असणे आवश्यक.

 

 

ई पीक पाहणी सहाय्यक नोंदणी करण्याची पद्धत

 

जर तुम्हाला ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकृत पोर्टल वर अर्ज करणे आवश्यक आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

> सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल किंवा आपण DCS MH या app वर देखील अर्ज करू शकता. >> येथे भेट द्या 

 

Dcs mh surveyor

 

>> होम पेज वर तुम्हाला Become a crop Surveyor / सर्वेक्षक व्हा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

> आता तुमच्यासमोर ई पीक पाहणी सहाय्यक नोंदणी अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून I hereby declare that I would be available for crop survey activities in the current season(Kharif) and year(2027) या चेक बॉक्स वर क्लिक करून Submit या बटनावर क्लिक करायचे आहे. e-Peek Pahani Sahayak

>Submit बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या Registered मोबाईल वर User Id आणि Password पाठवला जाईल.


>आता तुम्हाला Google Play Store वर जाऊन DCS MH हे अँप डाउनलोड करायचे आहे.


>अँप ओपन करून तुम्हाला भाषा निवडायची आहे आणि पुढे या बटनावर क्लिक करायचे आहे. e-Peek Pahani Sahayak


>आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

>आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला सहाय्यक म्हणून लॉगिन करा पर्यायावर क्लिक करायचे आहे.


>आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या user name आणि password टाकीन लॉगिन करायचे आहे.

 

अशा प्रकारे तुम्ही DCS MH अँप मध्ये लॉगिन करू शकता. e-Peek Pahani Sahayak

 

 

DCS MH अँप : डाउनलोड करा 

DCS MH वेबसाइट पोर्टल : येथे भेट द्या 

 

error: Content is protected !!
Created with ❤