Posted in

Karjamafi e-KYC Update : शेतकरी कर्जमाफी e-KYC शुल्क बाबत महत्वाची अपडेट | सेवा केंद्र व VLE यांना मिळणार प्रत्येक केवायसी मागे अनुदान?

Karjamafi e KYC Update
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Karjamafi e-KYC Update : पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतीकर कर्जमुक्ती योजना (PAHSKY) 2026 अंतर्गत आधार e-KYC साठी आपले सरकार सेवा केंद्र / VLE यानी शेतक-यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याबाबतचे परिपत्रक आज जारी केले आहे. (Karjamafi e-KYC Update)

 

राज्य शासनाचे दि.०२.०६.२०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना (PAHSKY) 2026 ही योजना सुरू केली आहे. यामध्ये कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना रु.२ लाखपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु.५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. (Karjamafi e-KYC Update)

 

सदर योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार e-KYC प्रक्रिया राज्यभर आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत (ASSK) करण्यात येत आहे, सदर e-KYC सेवासाठी VLE याना स्वतंत्र पणे सेवा शुल्क अदा करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. 

 

प्रत्येक VLE मार्फत करण्यात आलेल्या यशस्वी e-KYC संख्यांच्या आधारे, लागू सेवा शुल्काचे गणना करून महाआयटीमार्फत प्रत्येक महिन्याच्या अखेरीस संबंधित VLE च्या Wallet/खात्यामध्ये सदर रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजना अंतर्गत आधार e-KYC करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आपले सरकार सेवा केंद्र अथवा VLE यानी कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जाणार नाही व शेतकऱ्यांसाठी सदर e-KYC सुविधा पूर्णतः विनामूल्य आहे असे या परिपत्रकाद्वारे सांगितले आहे. (Karjamafi e-KYC Update)

 

सदर योजना राज्य शासनाची महत्त्वापूर्ण योजना असून संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणावर e-KYC प्रक्रिया सुरू आहे. सर्व आपले सरकार सेवा केंद्रांना कृपया खालीलप्रमाणे स्पष्ट सूचना देण्यात येतात ही विनंती या परिपत्रकाद्वारे करण्यात आलेली आहे. 

 

सूचना खालील प्रमाणे : 

  1. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतीकर कर्जमुक्ती योजना e-KYC साठी कोणत्याही शेतकऱ्यांकडून कोणत्याही स्वरूपाचे शुल्क घेतले जाणार नाही.
  2. प्रत्येक संबंधित केंद्रावर “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतीकर कर्जमुक्ती योजना e-KYC सेवा शेतकऱ्यांसाठी पूर्णतः विनामूल्य आहे” अशी सूचना फलक दर्शनी भागात लावण्यात यावी.
  3. कोणत्याही VLE ने शेतकऱ्यांकडून e-KYC साठी शुल्क आकारले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल. 

वरील प्रमाणे सूचना सर्व VLE यांना देण्यात आलेल्या आहेत. 

 

Karjamafi e-KYC Update karjamafi ekyc charges reg

error: Content is protected !!
Created with ❤