Peek Spardha Online Application : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. (Peek Spardha Online Application)
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी पुढील प्रमाणे स्टेप्स फॉलो करा :
1. प्रथम आपण कृषि विभागाच्या अधिकृत “पीक स्पर्धा” ऑनलाइन अर्ज साठी उपलब्ध करून दिलेल्या संकेत स्थळावर भेट द्या.
2. पुढे शेतकरी लॉगिन मध्ये आपला “फार्मर आयडी” टाकून ओटीपी पाठवा बटन वर क्लिक करा. (Peek Spardha Online Application)

3. लॉगिन झाल्यावर आपला तपशील दिसेल. त्यात आपला बँक तपशील, प्रवर्ग नमूद करा.


4. नंतर जतन करा व पुढे जा या बटन वरती क्लिक करा
5. पुढील पेज वरती ज्या पिकासाठी अर्ज करायचं आहे ते पीक निवडा, पीक लागवड तारीख नमूद करा आणि पुढे जा बटन वरती क्लिक करा.

6. पुढील पेज वरती तुम्हाला GRAS वरती फीस भरलेली पावती अपलोड करायची आहे. फिस कशी भरायची ते आपण खाली पाहू शकता.

7. फीस भरण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर जाऊन फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे पर्याय निवडून पेमेंट करावे.

7. आणि शेवटी आपला अर्ज सादर करायचं आहे.
अशा प्रकारे आपण पीक स्पर्धा साठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : या पोर्टल वर जा
ऑनलाइन GRAS वरती पेमेंट करण्यासाठी लिंक : येथे फिस भरा








