PM KISAN : पीएम किसान योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे त्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये जमा केली जाते. PM KISAN
केंद्र सरकारने कॅबिनेट बैठकीत आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पीएम किसान ही योजना पुढील 5 वर्षांसाठी म्हणजेच 2030-31 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी 3.15 लाख कोटी रुपयांच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. PM KISAN
आता पर्यन्त 23 हप्त्यामध्ये 4.47 लाख कोटी रुपये जमा
पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 23 हप्त्यामध्ये 4.47 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. 23 व्या हप्त्याद्वारे 9.49 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा झाला. आकडेवारीनुसार, सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात 18,984 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली होती. PM KISAN
तसेच PM-KISAN अंतर्गत महिला शेतकऱ्यांना 1.06 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असून, दर चार लाभार्थयांमध्ये जवळपास एक महिला शेतकरी आहे.PM KISAN
24 वा हप्त्याची रक्कम कधी मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार, 24 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात वितरित केला जाण्याची शक्यता असून सूत्रांनुसार नवरात्रीच्या काळात हा हप्ता जमा केला जाऊ शकतो. PM KISAN








