PMKSY Fund Sanction : कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन घटक जसे की तुषार, ठिबक साठी अनुदान दिले जाते. तर, या योजने साठी शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यासाठी महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. (PMKSY Fund Sanction)
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सुक्ष्म सिंचन) घटकासाठी सर्वसाधारण / अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गाचा ₹२०६५०.०१ लाख इतका निधी वितरित करण्याबाबत चा शासन निर्णय हा आज दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. (PMKSY Fund Sanction)
प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) या घटकासाठी सन २०२६-२७ करिता सर्वसाधारण प्रवर्गाकरिता केंद्र हिस्सा ₹९८४१.०० लाख व त्यास समरूप राज्य हिस्सा ₹६५६०.६७ लाख असा एकूण ₹१६४०१.६७ लाख, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा ₹१४७३.०० लाख त्यास समरुप राज्य हिस्सा ₹९८२.०० लाख असा एकूण ₹२४५५.०० लाख व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा ₹१०७६.०० लाख त्यास समरुप राज्य हिस्सा ₹७१७.३४ लाख असा एकूण ₹१७९३.३४ लाख असा एकूण ₹ २०६५०.०१ लाख (रुपये दोनशे सहा कोटी पन्नास लाख एक हजार मात्र) इतका निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. (PMKSY Fund Sanction)
या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करताना प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषि विकास योजना – प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे, तसेच, केंद्र शासनाच्या दिनांक २७.०४.२०२६ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ०५. लाभार्थ्यांना अनुदान वाटप करताना शासनाद्वारे वेळोवेळी विहीत केल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यात यावा. सदर योजनेच्या लाभार्थ्यांची निवड महा- डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात यावी व लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप आधार संलग्न बँक खात्यावर जमा करावा असे या शासन निर्णयात नमूद केलेले आहे. (PMKSY Fund Sanction)
लवकरच शेतकऱ्यांना मिळणार अनुदान?
कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन घटक जसे की तुषार, ठिबक साठी अनुदान दिले जाते तर आता या मंजूर रकमे मुळे प्रलंबित असलेले अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.








