DCS MH E-Peek Pahani : केंद्र शासनाची Digital Crop Survey (DCS MH) प्रणाली राज्यामध्ये प्रभावीपणे अंमलात आणणे व व्यवहार्य व उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले असून, सदर प्रणालीमुळे देशभर एक्समान पीक पाहणी कार्यपद्धती विकसित होईल, केंद्र व राज्य शासनामधील माहितीची देवाणघेवाण अधिक सुलभ, प्रमाणित व परिणामकारक होईल, तसेच AgriStack, Farmer Registry व इतर कृषी विषयक डिजिटल सेवांसाठी आवश्यक असलेली अचूक व प्रमाणित माहिती उपलब्ध होईल, असे समितीने विश्लेषण केले. त्याअनुषंगाने दिनांक २९ मार्च, २०२६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये खरीप हंगाम २०२६ पासून संपूर्ण राज्यामध्ये केंद्र शासनाच्या ‘DCS MH’ मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यारची सार्वानुमते शिफारस करण्यात आली. (DCS MH E-Peek Pahani)
चालू वर्षी पासून पीक पाहणी ही पीक पाहणी सहाय्यक हे करणार आहेत. तर, पीक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती संबंधित तहसिलदार यांनी करायची आहे. प्रत्येक १००० ते १५०० ओनर्स प्लॉटसाठी किमान एका पीक पाहणी सहाय्यकाची नियुक्ती करणे आवश्यक राहणार आहे. पीक पाहणी सहाय्यक म्हणून कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान (MSRLM) चे कर्मचारी, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चालक तसेच ग्रामस्तरावर मानधन तत्त्वावर कार्यरत इतर विभागार्तील कर्मचार्चांची नियुक्ती करण्यात यावी. मानधन तत्त्वावरील कर्मचारी उपलब्ध नसल्यास, MyBharat पोर्टलवर नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. (DCS MH E-Peek Pahani)
कोण करणार तुमची ई पीक पाहणी?
शेतकरी यांना पीक पाहणी करण्याची आवश्यकता नाही. तर, आपल्या गावातील तहसील कार्यालय मार्फत मानधन तत्वावर निवड करण्यात आलेले सहाय्यक जे कोणी असतील ते आपली ई पीक पाहणी करून देणार आहेत. त्यांना लॉगिन आयडी देण्यात आलेले आहेत केवळ त्यांच्या लॉगिन मधूनच या वर्षी पासून ई पीक पाहणी होणार आहे. त्यामुळे आपण आपल्या गावातील ई पीक पाहणी सहाय्यक यांच्याशी संपर्क करून आपली ई पीक पाहणी नोंद करून घ्यावी.
आमच्या गावात कोण आहे पीक पाहणी सहाय्यक?
ई पीक पाहणी सहाय्यक जर आपणास माहिती नसेल तर आपण आपल्या गावातील तलाठी/ग्राम महसूल अधिकारी यांना संपर्क करून याबद्दल माहिती घेऊ शकता. त्यानंतर, ई पीक पाहणी सहाय्यक यांच्याशी संपर्क केल्यानंतर ते आपल्या शेतातील गट क्रमांक मधी येऊन त्या ठिकाणी जे पीक आहे त्याची नोंद घेऊन अॅप्लिकेशन मध्ये फोटो घेतील. (DCS MH E-Peek Pahani)
ई पीक पाहणी कशी करायची ?
1. प्रथम ई पीक पाहणी सहाय्यक यांनी DCS MH हे मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करावे.
DCS MH हे मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड
2. त्यानंतर त्यांनी मोबाइल क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
3. पुढे आपल्याला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल.

4. माझी कार्ये मध्ये जावे , त्या ठिकाणी तुम्हाला सर्वेक्षण प्रलंबित यामध्ये जायचे आहे.
5. पुढे प्रलंबित सर्वेक्षण दिसतील, ज्या गटात पीक पाहणी नोंद करायची आहे त्या गटाच्या सर्वेक्षण सुरू करा या पर्याय वरती क्लिक करावे.

6. पुढे Map दिसेल, पुढे जा पर्याय क्लिक करायचं आहे.
7. पुढील पेज वरती आपण बिगरशेती वापर – नाही असे निवडायचे आहे, पुढे पडीक, नापीक असेल तर टाकायचे नसेल तर नाही पर्याय निवडावा. पुढे ऑलरेडी harvested हे देखील नाही निवडायचे आहे.
8. पुढे perennials – फळझाडे असतील तर, biennial ऊस सारखे पीक असतील तर, seasonal मध्ये आपले खरीप ची पिके निवडू शकता.
9. seasonal मध्ये add area करावा व आपल्या पिकाची माहिती भरून , प्लॉट वरील तीन फोटो घेऊन नोंदणी सादर करावी.

तर, आशा प्रकारे ई पीक पाहणी सहाय्यक हे पिकांची नोंद करणार आहेत. (DCS MH E-Peek Pahani)








