CIBIL Score : सीबील स्कोअर काय असतो भाऊ ? | बँक कर्ज देताना सीबील का पाहते?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

CIBIL Score : सीबिलची सक्ती करून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकरणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करू, अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राजस्तरीय बँकर्स समिती आणि आरबीआयच्या बैठकीत दिली.

 

Cibil Score Crop Loan

 

शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी पीक कर्जाची गरज असते तर, शेतकर्‍यांनी बँकेकडे कर्ज मागितल्यास बँक कर्ज देताना सिबीलची  CIBIL Score अट घालते आणि कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. तर, आता सीबिलची सक्ती करून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकरणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करू, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकाना दिला आहे.

 

 

सिबील म्हणजे काय भाऊ? CIBIL Score

 

सीबील चा फूल फॉर्म हा क्रेडिट इन्फर्मेशन ब्यूरो ऑफ इंडिया लिमिटेड असा आहे. सीबील म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर कर्ज घेतलं असेल तर त्या कर्ज फेडीचा जो लेखा जोखा असतो त्याला सीबील स्कोअर असे म्हणतात. तो लेखा जोखा तपासण्याचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँक देत असते.

 

 

सीबील मध्ये कर्जदाराचा सीबिल स्कोअर मोजण्यासाठी 300 ते 900 असे गुण असतात. जर कर्जदार नियमित कर्जफेड करत असाल तर त्याला अधिक गुण दिले जातात. जर एखाद्या कर्जदारचे 700 पेक्षा अधिक गुण असतील तर बँक त्यांना कर्ज देतात. पण सीबिल स्कोअर कमी असेल तर मग मात्र शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात नाही.

 

 

आता शेतकर्‍यांना सीबील शिवाय मिळणार पीक कर्ज | CIBIL Score for Crop Loan

 

 

error: Content is protected !!