Cotton Market Today: या देशात कापसाचे भाव वाढले | देशांतर्गत या बाजार समिति मध्ये दर बदल | वायदे बाजार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Cotton Market Today: कापूस दराच्या बाबतीत देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर दबावात दिसत होते. देशात तर मार्च महिन्यापासून कापूस दर हे स्थिरावले होते. परंतु आता कापसाचे भाव वाढत नसल्यानं शेतकरी कापूस विक्री साठी बाजारात आणत आहेत. पण चालू आठवड्यात वायद्यांमध्ये सुधारणा पहायला मिळाली आहे. आज रोजी अमेरिका, भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये कापूस दरात थोडीफार वाढ झालेली पहायला मिळत आहे.

Cotton Market Today

 

अमेरिकेतील कापूस दर

 

अमेरिकेत चालू आठवड्यात कापूस वायद्यांमध्ये सुधारणा झालेली आहे. अमेरिकेत कापसाचे वायदे मागील आठवड्यात हे 80 सेंट प्रतिपाऊंडवर होते आणि तेच आता या आठवड्यात 84 सेंटवर पोहोचले आहेत तर, अमेरिकेत कापसाच्या वायद्यांमध्ये Cotton Market Today जवळपास 5% वाढ झाली होती. अमेरिकेच्या बाबतीत कापसाला चीनकडून उठाव मिळाल्यामुळं त्यांच्या दरात सुधारणा झाल्याचं बाजारातील तज्ञ विश्लेषकांनी सांगितलं आहे.

 

ब्राझील मधील कापूस दर

 

ब्राझीलमध्ये कापूस दर दबावातच राहीलेले आहेत. इतर देशांमध्ये कापसाच्या दरात चालू आठवड्यात वाढ पहायला मिळाली आहे. Cotton Market Today कापसाच्या मागणीमध्ये सुधारणा दिसत असल्यामुळे दरात सुधारणा झाल्याचं बाजारातील तज्ञ विश्लेषक सांगत आहेत.

 

चीन मधील कापूस दर

चीनमध्येही कापसाचे भाव चालू आठवड्यात वाढ झालेली आहे. Cotton Market Today चीनमध्ये चालू आठवड्यात कापसाच्या भावात टनामागे 445 युआनची वाढ झालेली आहे. चीनमध्ये कापसाला आता 15650 युआनचा भाव सध्या मिळत आहे. चीन देशात कापडाला उठाव मिळत असल्यामुळे परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारावरही त्याचा परिणाम दिसत आहे.

भारतातील कापूस दर

 

भारता मध्ये कापूस वायद्यांमध्ये वाढ पहायला मिळाली आहे. Cotton Market Today शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एमसीएक्सवर MCX कापसाचे वायदे 180 रुपयांनी वाढले होते हे वायदे 63260 रुपये प्रतिखंडीवर बंद झालेले होते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वायद्यांमध्ये सुधारणा झाल्यामुळे परिणाम देशातील वायदे बाजारावरही झाला आहे. हीच सुधारणा पुढील आठवड्यात कायम राहू शकते, असा अंदाज जानकरांनी व्यक्त केला आहे.

 

देशांतर्गत बाजार स्थिति

वायद्यांमध्ये कापूस सुधारल्याचा परिणाम Cotton Market Today काही बाजार समित्यांमध्येही दिसला आहे. अनेक बाजार समिति मध्ये कापसाच्या दरात क्विंटल मागे 100 रुपयांची सुधारणा पहायला मिळाली आहे. परंतु कापसाच्या सरासरी दरात बदल पाहायला मिळाला नाही. कापसाचा सरासरी दर आजही 7500 ते 8100 रुपयांच्या दरम्यान कायम आहे. यामुळे वायद्यांमधील सुधारणेचा परिणाम प्रत्यक्ष बाजार समिति मध्ये कमीच प्रमाणात दिसला आहे.

राज्यातील कापूस दर

देशांतर्गत बाजारात कापसाची आवक पाच पटीने जास्त होती. Cotton Market Today गुजरातमध्ये सर्वाधिक 38 हजार गाठींची आवक झाली होती. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 32 हजार गाठींची विक्री केली आहे. त्यानंतर, तेलंगणात 9000 तर उत्तर भारतात 6000 गाठी कापूस बाजारात आल्या होत्या.

 

काही भागात शेतकऱ्यांकडे कापूस जास्त दिसत असला तरी सर्वच भागात ही परिस्थिती सारखी नाहीये त्यामुळे बाजारातील कापूस आवक कमी होत जाईल परिणामी बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील तज्ञ अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

 

अधिक वाचा :

* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे

* आता शेतकर्‍यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू

* ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ….

error: Content is protected !!