MahaDBT Farmer News: 15 मे नंतर महाडीबीटी योजनांची सोडत यादी बंद होणार का? | पहा काय आहे सत्यता…
नमस्कार शेतकरी बांधवांना, महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (MahaDBT Farmer News) द्वारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. या पोर्टल द्वारे अद्याप पर्यंत राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेला आहे.
महाडीबीटी शेतकरी योजना
महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टल द्वारे कृषी विभागामार्फत खालील योजनांसाठी लाभ दिला जात आहे :
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत तुषार संच ठिबक सिंचन या योजनांचा लाभ दिला जातो. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी लाभ दिला जातो.
कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल द्वारे ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे यामध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, ऊस खोडवा कटर, पलटी नांगर, मोगडा इत्यादी यंत्राचा लाभ दिला जातो. (MahaDBT Farmer News)
तसेच, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजना च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता शुगर केन हार्वेस्टर याचा देखील लाभ देण्यात येत आहे.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कांदाचाळ या घटकासाठी देखील लाभ दिला जात आहे.
समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या संदेश बद्दल?
शेतकरी बांधवांनो मागील चार दिवसांपासून समाज माध्यमांवर (MahaDBT Farmer News) महाडीबीटी योजना ची 15 मे नंतर सोडत होणार नसल्याबाबतचा संदेश प्रसारित झालेला आहे तर या बातमीबद्दल कृषी विभाग यांच्याशी चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे की ही बातमी चुकीची असून अशा प्रकारचा कोणताही संदेश कृषी आयुक्तालय किंवा कृषी विभाग मार्फत देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे खालील बातमी ही खोटी असून शेतकरी बांधवांनी त्याकडे दुर्लक्ष करावे.
तर शेतकरी बांधवांना महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर नियमितपणे अर्ज स्वीकारणे सुरू राहतील आणि शेतकरी योजनांची लॉटरी (MahaDBT Lottery) म्हणजेच सोडत यादी ही नियमितपणे काढण्यात येणार असल्याचे कृषि वियभगकडून सांगण्यात आले आहे. तर, वरील प्रमाणे सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा :
* पंजाब डख हवामान अंदाज 04 मे ते 23 मे
* आता शेतकर्यांना अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत
* या १७ जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती
* पोकरा योजना महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा