Kusum Solar Mahaurja Update 2023 : या जिल्ह्यांमध्ये कुसुम सोलर पंप योजना नवीन कोटा उपलब्ध | ऑनलाइन अर्ज सुरू
कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Mahaurja) ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविली जात असून या योजने अंतर्गत 2022 मध्ये काही जिल्ह्यांमध्ये सोलर पंप कोटा शिल्लक न राहिल्यामुळे तात्पुरत्या कालावधी साठी सोलार पंप योजनेचे अर्ज हे स्थगित करण्यात आले होते.
परंतु, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2023 या वर्षात सोलर पंप कोटा उपलब्ध झाला असून आपण महाऊर्जा या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपल्या जिल्हा निवडून अर्ज करू शकता.
सोलर पंप साठी कुसुम योजने (Kusum Solar Mahaurja) अंतर्गत ऑनलाइन अर्ज हे महाऊर्जा च्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करावयाचे आहेत. त्यासाठी, खालील कागदपत्रे ही आवश्यक आहेत..
सोलर पंप साठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल :
- सात बारा उतारा – विहीरीची नोंद असणे आवश्यक
- 8 अ उतारा
- आधार कार्ड
- लाभार्थी चा पासपोर्ट फोटो
- बँक खाते पासबूक
- सामाईक विहिरी असेल तर इतर खातेदारांचे ना हरकत दाखला
वरील प्रमाणे कागदपत्रे ही आवश्यक आहेत. (Kusum Solar Mahaurja) तर, वरील सर्व कागदपत्रे ही काढून घ्यावीत आणि स्कॅन करून त्या पोर्टल वर आपलोड करावीत.
कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Mahaurja) अंतर्गत नव्याने खालील जिल्ह्यांमध्ये कोटा उपलब्ध झाला असून अर्ज स्वीकारणे सुरू आहे.
जिल्हयांची नावे :
अकोला | अमरावती | रत्नागिरी |
नागपूर | वर्धा | रायगड |
गडचिरोली | पालघर | सातारा |
कोल्हापूर | चंद्रपूर | सांगली |
गोंदिया | पुणे | सिंधुदुर्ग |
भंडारा | ठाणे |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ वरती जाण्यासाठि खालील लिंक वरती जावे :
ऑनलाइन अर्ज साठी महाऊर्जा संकेतस्थळ : येथे क्लिक करा
अधिक वाचा :
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती
* पोकरा योजना महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा
* महाडीबीटी अनुदान जमा झाले का? येथे पहा…
* ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू ….