Crop Insurance: पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे | पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf
Crop Insurance: या वर्षी खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ३१ जुलै असून त्यापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
या वर्षी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना केवळ ‘एक रुपया’ भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे, म्हणजे शेतकर्यांना पीक विमा भरण्यासाठी फक्त 1 रुपया लागणार आहे आणि शेतकरी हिस्स्याची उर्वरित रक्कम ही राज्य शासन भरणार आहे. तर, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी 31 जुलै पूर्वी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे. (Crop Insurance)
पीक विमा (Crop Insurance) योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत :
- सात बारा उतारा आणि होल्डिंग
- आधार
- बँक खाते पासबूक
- पीक पेरा स्वयंघोषणा पत्र
पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf : येथे डाऊनलोड करा
अधिक वाचा :
* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा
* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध
* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार
* मंत्रिमंडळ बैठकीतील ‘हे‘ मोठे निर्णय
* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा