Crop Insurance : पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ | आता “या” तारखे पर्यंत भरता येणार पीक विमा
Crop Insurance : या वर्षी खरीप हंगामात (pik vima kharip 2024) पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै 2024 आहे. परंतु राज्यातील अद्याप बरेच शेतकरी बांधव हे पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
कृषि विभागाकडून केंद्राचे कृषि मंत्रालयाचे सचिव यांना पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत पीक विमा भरण्यासाठी राज्यामध्ये 31 जुलै पर्यन्त मुदत वाढ देण्या साठी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार आता राज्यातील शेतकर्यांना दिनांक 31 जुलै पर्यन्त पंतप्रधान पीक विमा योजना मध्ये सहभागी होता येईल.
तर, आता राज्यातील शेतकरी हे 31 जुलै पर्यन्त खरीप हंगाम 2024 चा पीक विमा भरू शकतील. (Crop Insurance)
मुदतवाढ : 31 जुलै 2024 पर्यन्त