e hakka pranali : आता शेतजमिनी संदर्भातील 11 प्रकारच्या फेरफार नोंदी ऑनलाइन घरबसल्या करण्याची सुविधा उपलब्ध
e hakka pranali : डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकपण कार्यक्रमांतर्गत शेतकरी व नागरिकांसाठी शेतजमिनी संदर्भातील एकूण 11 प्रकारच्या फेरफार नोंदी ह्या आता ऑनलाइन घरबसल्या करण्याची सुविधा ई-हक्क प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रणालीद्वारे नागरिक व शेतकऱ्यांना शेतजमिनीचे फेरफार नोंदी करणे सुलभ होणार असून ई-हक्क प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (e hakka pranali)
नागरिक व शेतकऱ्यांना सेवांसाठी शासकीय कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्रे सादर करावी लागतात. नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा आणि त्यांना कालमर्यादेत नोंदी उपलब्ध होण्यासाठी शासनाने ई-हक्क प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीद्वारे विविध प्रकारच्या 11 प्रकारची फेरफार नोंदीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (e hakka pranali)
नागरिक व शेतकऱ्यांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin या संकेतस्थळावर जाऊन प्रथम आपली नोंदणी करावी लागते. संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे तेथे नोंदणी केल्यानंतर युजर आयडी व पासवर्ड टाकून विहित माहिती भरावी आणि त्यानंतर आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता. (e hakka pranali)
ई-हक्क प्रणालीवर खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत :
ई-हक्क प्रणालीवर ई-करार नोंदी,
बोजा चढविणे/गहाणखत,
बोजा कमी करणे,
वारस नोंद,
मृतांचे नाव कमी करणे,
नोंद कमी करणे,
विश्वस्तांचे नाव बदलणे,
खातेदाराची माहिती भरणे,
हस्तलिखित व संगणकीकृत सातबारामध्ये तफावत दुरुस्ती करणे व मृत कुळाची वारस नोंद
अशा विविध प्रकारच्या 11 फेरफार सुविधा शेतकऱ्यांना करता येतील. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांचे कार्यालयास संपर्क साधावा.
संकेतस्थळ : https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती
* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….
* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान