Shetkari Mitra : प्रगतिशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा फायदा राज्यातील अन्य शेतकऱ्यांना मिळावा यासाठी ‘शेतकरी मित्र’ ही संकल्पना राज्यात राबविली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारचा कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि प्रगतिशील शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. हे शेतकरी मित्र सहायक कृषी अधिकाऱ्यासोबत काम करतील, त्या मोबदल्यात त्यांना मानधन देण्याचे शासनाचे नियोजन आहे.
हा प्रस्ताव प्राथमिक टप्प्यावर असून, वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीतील प्रयोग, शेतीसल्ला, मार्गदर्शन देण्यासाठी कृषी विभागाचा गावपातळीवरील कर्मचारी म्हणून सहायक कृषी अधिकारी काम पाहतात. मात्र त्यांना प्रत्येक गावात जाणे जमते असे नाही. शिवाय शेतकरी कृषी विभागाच्या तांत्रिक सल्ल्यावर विश्वास ठेवतातच असे नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शेतीत काम केलेल्या आणि प्रयोग यशस्वी केलेल्या शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष गावपातळीवर मार्गदर्शनासाठी सहभागी करून घेण्याचा कृषी विभागाचा विचार आहे. यासाठी शेतकरी मित्र ही संकल्पना राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. Shetkari Mitra
तालुका कृषी अधिकारी करणार अर्जांची छानणी
शेतीतील अनेक योजना, पीक पद्धती , प्रात्यक्षिके ही माहितीअभावी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच अनेक शेतकरी कृषी विभागाच्या पुरस्कारासाठी अर्जही देखील करत नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयोग इतर शेतकऱ्यांना माहिती होत नाहीत. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. शेतकरी मित्र साठी येणारे अर्ज हे तालुका कृषी अधिकारी हे छानणी करून अंतिम निवड केली जाणार आहे.
परंतु मानधन निधीबाबत साशंकता?
शेतकरी मित्र संकल्पनेतील नियुक्त व्यक्तीला ठरावीक मानधन देण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता घेतल्यानंतर प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला जाईल. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस जोवर या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविणार नाहीत तोवर हा प्रस्ताव कृषी विभागाकडे राहील. ‘शेतकरी मित्र’ या संकल्पनेसाठी आर्थिक तरतूद करावी लागल्यास हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर चर्चेसाठी जाईल किंवा विभागाच्या पातळीवर शासन आदेश काढून यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी मित्र नियुक्त केला जाईल, अशी माहिती कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. Shetkari Mitra
* शेतकर्यांना मिळणार मासिक रु. 3000/- मानधन | प्रधानमंत्री किसान मानधन योजना
* आता ठिबक संच खरेदी करताना केवळ अनुदान वजा रक्कम च द्यावी लागणार
* नवीन हंगाम साठी पिकनिहाय कर्ज किती मिळणार? पहा पीक नवीन पीक कर्ज मर्यादा
* अण्णासाहेब पाटील महामंडळा ची कर्ज प्रक्रिया झाली सोप्पी | नवीन मोबाइल app सुरू
* रासायनिक खतांच्या दरात वाढ? | खरीपाचा खर्च वाढणार? पहा नवीन दर
* “या” तारखेपासून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार
* शेतजमीन वाटणी वरती आता कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही
* “या” 9 जिल्ह्यात राबविली जाणार “प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना”
* नवीन मंडळांचे पीक विमा स्टेटस अपडेट झाले आहेत?
* खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान करिता अर्ज सुरू | “या” शेतकर्यांना अर्ज करता येणार नाही?
